माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाला दिला राजीनामा..
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी आज संपर्क कार्यालय बैठक घेऊन सर्व पदाधिकाऱ्यांचा सहमतीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला दिला राजीनामा .माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी विधानसभेचे त्यांनी वैजापूर तालुक्यात दोन अपक्ष निवडणूक लढविले व ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले व एक पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढविले व ते विजयी झाले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )गटात त्यांनी मागील काही दिवसांपूर्वी प्रवेश केला होता.
परंतु त्यांच्याकडून विधानसभेचे उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी शिवसेना पक्षाला सोडचिट्टी दिली व येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट )यांच्याकडे प्रवेश करणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळाली त्यांनी सुद्धा विधानसभेची जागा न सुटल्यास मनोज पाटील जरांगे यांनी जर उमेदवारी दिली तर आम्ही त्यांच्याकडे सुद्धा विधानसभेचे तिकीट मागणार असल्याचे भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी आज वैजापूर येथील संपर्क कार्यालयात ही माहिती दिली.