पालखेड डाव्या कालव्याचे आरक्षित पाणी नारंगी सारंगी धरणात त्वरित सोडावे.
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
मंजाहरी पाटील गाढे. तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार. *पालखेड डाव्या कालव्याचे आरक्षित पाणी नारंगी सारंगी धरणात सोडावे यासाठी अधीक्षक अभियंता पालखेड डावा कालवा येवला व उपविभागीय अधिकारी वैजापूर यांना निवेदन देऊन श्री मंजाहरी पाटील गाढे यांनी नारंगी सारंगी धरणात पालखेड डाव्या कालव्याचे पाणी सोडण्यात यावे सध्या स्थितीत धरण हे पूर्णपणे कोरडे असून या धरणात पालखेड डाव्या कालव्याचे पाणी मिळाल्यास वैजापूर शहर व परिसरातील 15 ते 20 गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल कारण सध्या धरणात एक थेंबही पाणी नाही येत्या दोन दिवसात पाणी सोडले नाही तर दिनांक 05/09/ 2024 वार गुरुवार रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल व सदर आंदोलनाची जबाबदारी या

कार्यालयाची व प्रशासनाची राहील असा गर्भित इशारा श्री गाढे पाटील यांनी दिला. यावर शासन स्तरावर काय प्रक्रिया होते. नारंगी सारंगी धरणात पाणी येईल की नाही येणार यावर आंदोलनाची दिशा ठरवली जाईल अशी माहिती मंजाहरी गाढे पाटील यांनी दिली. याप्रसंगी या कार्यक्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.


















Leave a Reply