Advertisement

‘राज्य उत्पादन’ च्या मिरज विभागाची सांगलीत कारवाई; लाखो रुपये किमतीचा विविध कंपन्यांचा गोवा मेड विदेशी मद्यसाठा जप्त; एकास अटक

प्रतिनिधी सुधीर गोखले
नुकतेच राज्य उत्पादन शुल्क च्या मिरज विभागाने सांगली येथील उत्तर शिवाजी नगर येथे रविवारी कारवाई करत विशाल मारुती पवार यास गोवा मेड विदेशी मद्यासह अटक केली होती मा.न्यायालयाने त्या संशयितास पोलीस कोठडी मंजूर केली आहे. त्यानुसार मिरज विभागाचे निरीक्षक तथा उपाधीक्षक दीपक सुपे यांनी त्यांच्या पथकासह जिल्हा अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या सूचनेनुसार या प्रकरणी संशयित आरोपी विशाल पवार याची अधिक चौकशी केली असता संशयित आरोपी  दत्तात्रय भीमराव बंडगर याच्या नावाचे निष्पन्न झाले. त्यास अटक करून अधिक तपस केला असता सांगलीतील १०० फुटी रस्त्यावरील डी मार्ट जवळ असलेल्या एका गॅरेज जवळ उभ्या असलेल्या रेनॉल्ट कंपनीच्या चार चाकी ट्रीबर मॉडेल गाडी नंबर MH ०८ AN ८१७१ मध्ये सुमारे २ लाख ३ हजार ३७० रुपये किमतीचा गोवा राज्य निर्मित विदेशी कंपन्यांचा मद्य साठा तसेच ५० हजार २९२ रुपयांची प्लास्टिक बुचे आणि रु ५ लाख रु किमतीचे वाहन असे एकूण ७ लाख ५३ हजार ६६२ रु किमतीचा मुद्देमाल मिळून आला तो पथकाने ताब्यात घेतला आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधींनी अधीक्षक प्रदीप पोटे आणि उपाधीक्षक दीपक सुपे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले,’पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये विषारी मद्य प्राशन करून ज्या व्यक्ती मृत्यू मुखी पडल्या त्यानंतर संपूर्ण राज्यात अवैध देशी किंवा गोवा मेड मद्याच्या तस्करीवर मोठ्या प्रमाणावर कारवाया सुरु आहेत मात्र, सांगली जिल्ह्यामध्ये यापूर्वीपासून अशा प्रकारच्या कारवाया आम्ही करत आलो आह. आमच्या मिरज विभागाने रविवारी आणि सोमवारी ज्या प्रकारे दोन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावर गोवा मेड विदेशी मद्य साठा जप्त केला आहे या दोनही कामगिऱ्या उल्लेखनीय आहेत. दोन दिवसापूर्वी उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः हातभट्टी उध्वस्थ करण्याच्या कारवाई मध्ये सहभाग घेतला होता त्याच प्रमाणे आमचे सहकारी अधिकारी प्रभारी उपाधीक्षक आणि मिरज विभागाचे निरीक्षक दीपक सुपे यांच्या नेतृत्वाखाली सांगलीतील रविवारी आणि सोमवारी झालेल्या या कारवाया कौतुकास्पद आहेत. यावेळी अधीक्षक प्रदीप पोटे म्हणाले काही कारवाया या आमच्या नियमित होणाऱ्या असतात. मात्र तुम्ही एकंदरीत आमच्या कार्यालयातील आकडेवारी चा अभ्यास केला तर आमच्या म्हणजे मी आणि उपाधीक्षक दीपक सुपे यांच्या कार्यकाळात सांगली जिल्ह्यामध्ये अर्धा प्रकारे अवैध गोवा मेड विदेशी मद्य आयातीवर किंवा जिल्ह्यातील वाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर अंकुश आला आहे. किरकोळ घटना वगळता काही ठिकाणी मोठ्या कारवाया अधिक झाल्या आहेत. हातभट्ट्या बाबत हि आमच्या विभागाने वारंवार कारवाया केल्या आहेत. या दोनही कारवाई मध्ये मिरज विभागाचे निरिक्षक तथा प्रभारी उपाधीक्षक दीपक सुपे तसेच मिरज चे दुय्यम निरीक्षक अजय लोंढे, जयसिंग खुटावळे, लक्ष्मण पोवार, जवान स्वप्नील अटपाडकर, विनायक खांडेकर (मेजर) स्वप्नील कांबळे, श्रीमती शाहीन शेख, श्रीमती कविता सुपाने यांनी सहभाग घेतला अधिक तपास जयसिंग खुटावळे करत आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!