Advertisement

‘प्रशासकीय सेवेत जाणे ही केवळ एक नोकरी नसून समाजपरिवर्तनाची एक सुवर्णसंधी आहे’;.आयुक्त संजीता मोहपात्र (IAS); MPSC/UPSC स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचा सांगलीत प्रारंभ

प्रतिनिधी सुधीर गोखले
योग्य नियोजन, अभ्यासातील सातत्य आणि कठोर मेहनतीच्या बळावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही या परीक्षांमध्ये उत्तम यश मिळवू शकतात,” असे प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त संजीता महापात्र (भा.प्र.से.) यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालय सांगली, जिल्हा परिषद सांगली आणि सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच श्री गणपती पंचायत संस्थान यांच्या सहकार्याने आयोजित UPSC/MPSC स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शन शिबिराचे पहिले सत्र आज सकाळी एकात्मता भवन श्री गणपती पंचायतन संस्थान च्या श्री गणपती मंदिर येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाले. या सत्रात मुख्य मार्गदर्शक म्हणून आयुक्त संजीता महापात्र यांनी उपस्थित ३०० हून अधिक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या यशाचा ‘रोडमॅप’ दिला. यावेळी त्या म्हणाल्या ‘UPSC आणि MPSC का निवडावी तर IAS, IPS, उपजिल्हाधिकारी, डीएसपी, तहसीलदार या पदांसह बँकिंग, SSC व रेल्वे अशा अनेक स्पर्धा परीक्षांचे मार्ग एकाच अभ्यासक्रमातून कसे मोकळे होतात, हे सोदाहरण स्पष्ट केले. स्पर्धा परीक्षांबाबत असणारे गैरसमज दूर करताना आयुक्त म्हणाल्या की, “या परीक्षांसाठी इंग्रजीची अनिवार्यता किंवा दिल्लीला जाऊनच अभ्यास करण्याची गरज नाही. आजच्या डिजिटल युगात मराठी माध्यमातून घरबसल्या अभ्यास करूनही अनेक ग्रामीण विद्यार्थी देशात अव्वल आले आहेत.” त्यांनी पूर्व परीक्षा (वस्तुनिष्ठ), मुख्य परीक्षा (वर्णनात्मक) आणि मुलाखत (व्यक्तिमत्त्व चाचणी) या तिन्ही टप्प्यांची सविस्तर मांडणी केली. तसेच इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थव्यवस्था आणि चालू घडामोडी या मुख्य विषयांच्या तयारीची साखळी समजावून सांगितली. सातत्य आणि पुनरावलोकन सराव = यश असे सूत्र मांडून, दररोज वृत्तपत्र वाचन, मूलभूत पुस्तकांचे (NCERT) आकलन आणि नियमित उत्तरलेखनाचा सराव करण्याचा सल्ला त्यांनी नवशिक्या उमेदवारांना दिला. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, दिनेश जाधव, सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते, संस्थान चे अधिकारी मारुती अक्कीमडी राकेश डडण्णावर यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!