Advertisement

शिंदेवाडी गावात मिरज ग्रामीण ची जुगार अड्ड्यावर छापेमारी; हजारो रुपयांची रोकड जप्त; पाच जणांवर गुन्हा दाखल

प्रतिनिधी सुधीर गोखले
मिरज तालुक्यातील शिंदेवाडी गावामध्ये तीन पानी जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी पथकासह एका शेड वर छापेमारी करत हा जुगार अड्डा उध्वस्थ केला. सात हजार रुपयांची रोकड जप्त केली आणि पाच  संशयितांवर कारवाई करत गुन्हा नोंद करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली ते म्हणाले, आम्हाला मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार शिंदेवाडी परिसरात हा पत्र्याच्या शेड मध्ये सुरु असलेला तीन पानी जुगार अड्डा आम्ही आमच्या पथकासह आज उध्वस्थ केला आहे. या आमची केलेल्या कारवाईमध्ये विजय गणपती मिरजे वय ६० रा आरग, देवेंद्र सुरेश कांबळे वय ४६ रा माळभाग गणेशवाडी ता. शिरोळ, सुरज सुकुमार कांबळे वय ३० रा कागवाड जि बेळगाव,संजय मल्हारी राजमाने वय ५० रा उगार खुर्द जी बेळगाव. अशा पाच जणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे या छपेमारी मध्ये रोख रक्कम ७ हजार हस्तगत करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे येथील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!