सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकांच्या प्रभाग ४ मधील नवनियुक्त नगरसेविका सौ अपर्णा विवेक शेटे यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज येथे पद्मावती शांतीसेवा फौंडेशन च्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष आणि उद्योजक विवेक (बंडू) शेटे यांनी दिली. ते म्हणाले दि १८ जून रोजी नगरसेविका सौ अपर्णा शेटे यांचा वाढदिवस त्या नगरसेविका झाल्यावर पहिल्यांदाचयेत आहे त्यानिमित्त आम्ही शालेय मुलांना मोफत वह्या वाटप उपक्रम आयोजित केला आहे, प्रभाग चार मधील गरजू आणि होतकरू विद्यार्थी विद्यार्थिनी ना आम्ही प्रत्येकी चार वह्यांचा संच मोफत देणार आहोत होतकरू आणि गरजू विद्यार्थी विद्यार्थिनींच्या पालकांनी आमच्या तांदूळ मार्केट मिरज येथील संपर्क कार्यालयामध्ये नाव नोंदणी करावी. त्याच प्रमाणे मोठ्या प्रमाणावर प्रभागामध्ये वृक्ष लागवडीचा संकल्प आम्ही केला आहे. मुळातच नवनियुक्त नगरसेविका सौ अपर्णा विवेक शेटे यांना शिक्षणाची आवड असल्याने त्यांच्या संकल्पनेतून बकुलबाग येथे फर्स्ट स्टेप प्री स्कुल या सी बी एस सी पॅटर्न वर आधारित इंग्रजी शाळेची निर्मिती झाली सर्वसामान्य कुटुंबातील मुला मुलींना चांगले आधुनिक शिक्षण तेही अल्प खर्चात घेता यावे यासाठी या शाळेची उभारणी आम्ही केली आहे. आमच्या प्रभागामध्ये आम्ही चारही नगरसेवक एक दिलाने जनसेवेमधे आहोत. Website: http://satyarath.com/wp-admin
Leave a Reply