पाचोरा : शांताराम चौधरी सर “जीवनगौरव” पुरस्काराने सन्मानित !
पाचोरा येथील गो.से.हायस्कुल चे सेवानिवृत्त पर्यवेक्षक शांताराम सुखदेव चौधरी सर (पत्रकार) म.रा.म.पत्रकार खान्देश विभागीय अधिवेशनात “जीवनगौरव” पुरस्काराने सन्मानित!
येथील गो.से.हायस्कुल चे सेवानिवृत्त पर्यवेक्षक पत्रकार ग्राहक पंचायत महाराष्ट्र तालुका अध्यक्ष पाचोरा शहर तेली समाजाचे सचिव मा.शांताराम सुकदेव चौधरी सर यांनी केलेल्या सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कार्याबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे सन 2024 चा जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई सरचिटणीस माननीय डॉक्टर श्री विश्वासराव आरोटे माऊली कार्याध्यक्ष माननीय प्रवीण सपकाळे पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार माननीय श्री किशोर आप्पा पाटील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई खानदेश विभागीय अध्यक्ष माननीय किशोरजी रायसाकडा विभागीय उपाध्यक्ष भुवनेशजी दुसाने जिल्हाध्यक्ष भूषण महाजन जिल्हाध्यक्ष नागराज पाटील इ. मान्यवरांच्या शुभ हस्ते जीवन गौरव पुरस्काराची आकर्षक ट्रॉफी शाल श्रीफळ गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.