प्रतिनिधी- तुषार मारुती केंगार
रिपोर्टर ,
सोलापुर जिल्हा
अकलूज व परिसरामध्ये विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा आंदोलनाचा इशारा
अकलूज शहरासह माळेवाडी संग्रामनगर यशवंतनगर या भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना सुरळीत विद्युत पुरवठा होत नसल्याने पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करून त्यांना होणारा मानसिक व आर्थिक त्रास दूर करण्याची मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता काळे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनामध्ये गेल्या काही दिवसांपासून अकलूज शहरासह माळेवाडी संग्रामनगर व यशवंतनगर या भागामध्ये नागरिकांना कोणतीही माहिती न देता विद्युत पुरवठा दिवसातून चार ते पाच तास बंद केला जात असून दिवसातून दररोज चार ते पाच वेळा लाईट बंद चालू केली जाते यामुळे नागरिकांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचेही नुकसान होत असून यामुळे नागरिकांना आर्थिक व मानसिक त्रास मोठ्या प्रमाणावर होत आहे तसेच लाईट बिल भरले नाही म्हणून नागरिकांचे लाईट कनेक्शन कट केले जात आहेत ते त्वरित थांबवून यातील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करून नागरिकांना अखंडित विद्युत पुरवठा करून त्यांना होणारा आर्थिक व मानसिक त्रास दूर करावा अन्यथा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने नजीकच्या काळात आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुकाध्यक्ष हेमंत कांबळे युवक तालुकाध्यक्ष सचिन मोरे अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे तालुका उपाध्यक्ष पांडुरंग चव्हाण तालुका सरचिटणीस दयानंद कांबळे तालुका खजिनदार विश्वास उघाडे तालुका युवक कार्याध्यक्ष शिवम गायकवाड तालुका संपर्कप्रमुख राजू बागवान सहसंपर्कप्रमुख रोहिदास तोरणे, तालुका सहसरचिटणीस विकास तोरणे तालुका युवक सरचिटणीस तुषार केंगार सहसरचिटणीस समाधान मदने तालुका खजिनदार मल्हारी चव्हाण तालुका युवक संघटक कबीर मुलानी आकाश गायकवाड अजय साळुंखे संदीप तोरणे दीपक शिरतोडे तानाजी धनवडे नवनाथ भोसले प्रवीण महिडा योगेश डावरे अभिषेक पवार शिवाजी कांबळे आदी पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.