प्रतिनिधी- तुषार मारुती केंगार
रिपोर्टर ,
सोलापुर जिल्हा
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी कुर्डूवाडीच्या आशाताई रिकिबे तर सोलापूर शहर अल्पसंख्यांक अध्यक्षपदी नबीलाल खरादि यांची निवड
राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे सर व राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप भाई कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या सोलापूर जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षपदी कुर्डूवाडीच्या आशाताई रिकिबे यांची तर सोलापूर शहर अल्पसंख्यांक अध्यक्षपदी नबीलाल खरादि यांची निवड महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले व सोलापूर जिल्हाध्यक्ष अमित कांबळे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन करण्यात आली.
गुरुवार 22 ऑगस्ट रोजी सोलापूर शहरातील संपर्क कार्यालयामध्ये ही निवड करण्यात आली निवड झाल्याबद्दल बुके देऊन त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे यांनीही निवडीबद्दल फोनवरून शुभेच्छा दिल्या निवडीला उत्तर देताना महिला जिल्हाध्यक्ष आशाताई रिकीबे म्हणाल्या की युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले व सोलापूर जिल्हाध्यक्ष अमित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यामध्ये महिला आघाडीची ताकद वाढवून पीपल्स रिपब्लिकन पार्टीची महिला आघाडी मजबूत करणार असून राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर व राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदिपभाई कवडे यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना न्याय देणार आहे.यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष विश्वजीत सरवदे सोलापूर शहराध्यक्ष शरणू हजारे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष जावेदभाई बानकरी जिल्हा संपर्क प्रमुख महीबूब शेख, माळशिरस तालुका युवक सरचिटणीस तुषार केंगार शहर युवक अध्यक्ष गोपीचंद तीकुटे अक्कलकोट तालुका युवक अध्यक्ष वाहिद मुस्तफा, सोलापूर शहर मिडिया प्रमुख सद्दाम पठाण आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते