प्रतिनिधी- तुषार मारुती केंगार
दी- १५-०८-२०२४
रिपोर्टर ,
सोलापूर जिल्हा
अकलूज नगर परिषदेचे आरोग्य अधिकाऱी यांच्या हलगर्जीपणामुळे दलित वस्तीतील नागरिक साथीच्या रोगांनी त्रस्त
अकलूज नगर परिषद हद्दीमधील माळेवाडी अकलुज येथील दत्तनगर या दलित वस्तीतील नागरिक , लहान मुले , गरोदर महिला व युवक वर्ग सद्धया डेंगू , मलेरिया , चिकन गुनिया अशा वेदनादायी साथीच्या आजारांनी त्रस्त असून या परिसरामध्ये अस्वच्छता तसेच रस्त्यांवरचे वाढलेले गवत , डासांसाठी कोणत्याही प्रकारच्या उपाय योजना न करणे या सर्व गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून , आरोग्य अधिकारी यांना या सर्व प्रकारची माहिती देऊन सुद्धा वारंवार नगर परिषद मधील आरोग्य अधिकारी येथील दलित वस्तीतील नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळताना दिसत आहेत , जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तात्काळ याची दखल घ्यावी व नागरिकांना चांगल्या प्रकारचे आरोग्य लाभण्यासाठी आदेश देऊन संबंधितांवर कारवाही करण्याची मागणी नागरिकांमधून होताना दिसत आहे.