Advertisement

संभाजीनगर : लहानपणीच्या मैत्रीणीसोबत लग्न केलं अन् सैराटची थरारक पुनरावृत्ती!

संभाजीनगर : लहानपणीच्या मैत्रीणीसोबत लग्न केलं अन् सैराटची थरारक पुनरावृत्ती!

संभाजीनगरमध्ये 14 जुलै रोजी घडलेल्या थरारक घटनेत आंतरजातीय प्रेमविवाहाच्या रागातून मुलीचे वडील आणि चुलत भावाने जावयावर गंभीर हल्ला केला. इंदिरानगरमध्ये घडलेल्या या घटनेत अमित मुरलीधर साळुंखे हा तरुण गंभीर जखमी झाला होता. पोट व छातीत खोलवर वार झाल्याने गुरुवारी अमितचा घाटी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे संभाजीनगरमध्ये एक वेगळाच तणाव निर्माण झाला आहे. आंतर जातीय प्रेमविवाह: बालपणीचे प्रेम, सासरच्यांचा राग•• खासगी कंपनीत काम करणाऱ्या अमितची लहानपणीची मैत्रीण विद्या सोबत प्रेम संबंध होते. मात्र अंतर जातीय प्रेमविवाहामुळे विद्याच्या कुटुंबीयांचा त्यांच्या लग्नास विरोध होता. विरोध पत्करून एप्रिल महिन्यात दोघांनी पळून जाऊन लग्न केले. अमितच्या कुटुंबांनी दोघांना स्वीकारल्याने ते दोन मे रोजी ते घरी परतले. त्यानंतर त्यांचा गुण्या गोविंदाने संसार सुरू झाला. मात्र, विद्याच्या कुटुंबीयांच्या मनातला राग गेला नव्हता. विद्याचे वडील गीताराम भास्कर कीर्तीशाही व चुलत भाऊ आप्पासाहेब अशोक कीर्तीशाही हे सतत अमितला जीवे मारण्याच्या धमक्या देत होते. हत्या आणि निषेध: कुटुंबीयांचा संताप•• 14 जुलै रोजी अमित फिरत असताना गीताराम आणि आप्पासाहेबने त्याच्यावर चाकूने गंभीर वार केले. तेव्हापासून अमितवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी अमितची मृत्यूची झुंज अखेर संपली. अमितवरील हल्ल्याला अकरा दिवस उलटूनही मारेकरी वडील व भावाला जवाहर नगर पोलिसांनी अटक न केल्याने अमितच्या पत्नीसह त्याच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला. अमितच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेत त्यांच्या कुटुंबीयांनी जवाहर नगर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला. काल रात्री उशिरापर्यंत कुटुंब ठाण्यात ठाण मांडून होते. पोलिसांनी मारेकऱ्यांना अटक करण्यात निष्काळजीपणा केल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. शिवाय सासरा गीताराम व आप्पासाहेब व्यतिरिक्त पाच ते सहा जणांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचे त्यांनी सांगितले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!