पाचोरा : भरधाव वाहन जोरदार आदळले…
पाचोरा शहरातील रेल्वे उड्डाण पुलावर जळगाव चौफुली कडून भडगावच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव मालवाहतूक पिकअप वाहन रस्त्याच्या बाजूला असलेल्या संरक्षक लोखंडी कठड्यावर आदळल्याची घटना दिनांक 19 जुलै शुक्रवार रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास घडली आहे. पाचोरा शहरातील रेल्वे उड्डाण पुलावर जारगाव चौफुली कडून भडगावच्या दिशेने केळीचे घोडे असलेल माल घेऊन जात असणारे भरधाव पांढऱ्या रंगाचे पिकप वाहन रेल्वे उड्डाणपुलावरून उतरत्या दिशेने उतरत असताना वाहणात अचानक तांत्रिक बिघाड होऊन चालकाचा वाहनावरील ताबा सुटून सदर मालाने भरलेले वाहन चालत्या दिशेच्या विरुद्ध दिशेला जाऊन फुलाच्या संरक्षक कठड्यांवर जाऊन आदळले, सदर अपघातात सुदैवाने जीवित हानी टळली असून वाहन चालकास किरकोळ मार लागला आहे. त्यास पुढील उपचारासाठी रुग्णालयात रवाना केल्याने वाहना बद्दल, चालक व मालकाबद्दल ची अधिकची माहिती मिळू शकली नाही. सदर वाहन लोखंडी कठड्यावर इतके जोरदार आदळले की परिसरातील नागरिकांनी आवाजाची कल्पना घेऊन घटनास्थळाकडे धाव घेतली होती.