पाचोरा : भव्य बालकिर्तन महोत्सवाचे आयोजन..
आपल्या पाचोरा शहरातील लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था तथा अनाथालय यांनी आषाढी एकादशी निमित्ताने संस्थेत भव्य अशा बाल कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे या महोत्सवांमध्ये सर्व कीर्तने हि लहान मुलांची होणार असून त्यांच्या मुखातून भगवंताच्या गुणांचे वर्णन ऐकण्यास मिळणार आहे आणि ही आपणा सर्वांसाठी एक विशेष पर्वनी आहे पाचोरा येथील लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था या संस्थेमध्ये वर्षभर विद्यार्थ्यांना भजन कीर्तन प्रवचन गायन पखवाज वादन आदी करून शिकविले जाते व त्यासोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याच्यावर भर दिली जाते संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी हे पंढरपूरच्या दिशेने गेले असताना आपल्या पाचोरा शहरात देखील भगवंताच्या नामाचा गजर व्हावा या हेतूने संस्थाचालक ह भ प सुनीताताई पाटील व योगेश महाराज पाटील या दोघांनी आपल्या शहरात देखील पंढरपूर उतरावे या अनुषंगाने संस्थेमध्ये असलेल्या श्री विठ्ठल मंदिरामध्ये बाल कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे या सप्ताहामध्ये सकाळी काकड आरती त्यानंतर विष्णुसहस्रनाम त्यानंतर दुपारून प्रवचन हरिपाठ व रात्री कीर्तन अशा पद्धतीने सात दिवसाचा दिनक्रम असणार आहे सात दिवसाच्या कीर्तनामध्ये अंकुश महाराज चव्हाण, वैशालीताई ठाकरे सागर महाराज धुमाळ यश महाराज चव्हाण सुषमाताई राजपूत कार्तिकीताई महाराज पाटील निखिल महाराज पाटील यांचे कीर्तन होणार असून काल्याचे किर्तन आदेश महाराज जाधव यांचे होणार आहे या सप्ताहामध्ये गायक आणि वादक हे सुद्धा लहान मुलाच आहेत गायनासाठी साथ प्रवीण महाराज राजपूत स्वप्निल महाराज अहिरे गोपाल महाराज पाटील साई महाराज धुमाळ वैष्णवी ताई नलावडे आणि देवयानी ताई पाटील हे करणार असून मृदुंग वादनासाठी रामप्रसाद महाराज गायकवाड गुणवंत महाराज चौधरी राधिकाताई महाराज पाटील हे साथ करणार आहेत तरी या सर्व कार्यक्रमांचा लाभ सर्व शहरवासीयांनी घ्यावा असे आवाहन योगेश महाराज व सुनिता ताई यांनी केले आहे तसेच संस्थेतर्फे आषाढी एकादशीच्या दिवशी गावामध्ये नगरप्रदक्षिणा होणार आहे