प्रतिनिधी- तुषार मारुती केंगार
रिपोर्टर ,
सोलापुर जिल्हा
पीपल्स रिपब्लिकन पार्टी PRP चे युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांची मुंबई येथे पत्रकार परिषद..
पीपल्स रिपब्लिकन पार्टी PRP चे युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी मुंबई येथे ०९-०७-२०२४ रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदे मध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टी PRP चे वरिष्ठ उच्चस्तरीय शिष्ठमंडळ ज्यामध्ये प्रदेश उपाध्यक्ष मृणाल गोस्वामी , पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अमित सोनवणे , युवराज कांबळे , हेमंत कांबळे , विश्वजीत सरवदे तसेच विविध पदाधिकारी , मुंबई येथील पत्रकार बंधू उपस्थित होते , पत्रकारांशी संवाद साधत PRP युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी आपले मत व्यक्त करत , संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असणारी खंत व्यक्त केली असता त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे व महायुती सरकार कडे विविध स्वरूपाच्या मागण्या केल्या . पीपल्स रिपब्लिकन पार्टी-PRP हा पक्ष शिवसेना – शिंदे गटाचा मित्र पक्ष असून , महायुतीचा घटक पक्ष असताना देखील गेल्या दोन वर्षांमध्ये PRP पक्षाला अजून पर्यंत सत्तेत वाटा मिळाला नसल्याने , कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाची लाट निर्माण झाली असून , पीपल्स रिपब्लिकन पार्टी-PRP चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे यांना विधान परिषद मध्ये स्थान देऊन पक्षाला सत्तेत वाटा द्यावा , त्याचबरोबर विविध मागण्या करत , आगामी विधानसभा काळामध्ये PRP या पक्षाची पुढील असणारी ध्येय धोरणे स्पष्ट केली.