भडगाव :- मध्यवर्ती RTO कार्यालयाला मिळाला तीन महिन्यात कोटींचा निधी

भडगाव :- दिनांक २० मार्च रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय भडगाव शहरात सुरू झाल्यानंतर भडगाव तालुक्यासह पाचोरा, पारोळा, अमळनेर, भडगाव अशी चार तालुके मिळून मध्यवर्ती आरटीओ कार्यालय मंजूर झाले. त्यामुळे भडगाव तालुक्याला मध्यवर्ती कार्यालय म्हणून MH-54 अशी नवीन ओळख निर्माण झाली आहे. २० मार्च रोजी वाहन नोंदणी ला प्रत्यक्ष सुरवात होऊन मार्च अखेर ५७ लाख ३८ हजार ५४८ रुपये, एप्रिल अखेर १कोटी ९४ लाख ६३हजार ४६४ रुपये, मे अखेर २कोटी ४० लाख ३ हजार ९८३रुपये, व २०जून २०२४ अखेर ९२ लाख १४ हजार १३७ रुपये असा गेल्या तीन महिन्याच्या कालावधीत आजपर्यंत कार्यालयाच्या माध्यमातून शासनाला ५ कोटी ४८ लाख २० हजार १३२ रुपयांचा महसूल मिळाला आहे. व वाहन नोंदणी ट्रान्सपोर्ट वाहन-६३, दुचाकी तीनचाकी – २०००, चारचाकी-३०० अशी २० जूनपर्यंत २ हजार ३८७ वाहनांची नोंदणी झालेली आहे. सध्या येथे श्री विलास चौधरी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, श्री टिक्के सर, श्री काळे सर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, श्री संदीप पाटील आस्थापना विभाग, श्री अनिल ठाकरे, श्री सोमा ठेलारी कनिष्ठ लिपिक म्हणून काम सांभाळत आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा भडगाव तालुक्यासाठी स्वतंत्र उपप्रादेशिक कार्यालय सुरू व्हावी अशी मागणी भडगावकर व वाहन धारकांकडून करण्यात येत होती. वाहन धारकांना वाहनांची नोंदगी तसेच पासिंग करण्यासाठी ८० ते १०० किलोमीटर अंतर कापून जळगाव जावे लागत होते. मात्र सदर कार्यालय भडगाव येथे प्रक्रिया चालू असतांना चाळीसगाव येथे चाळीसगावचे आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या प्रयत्नातून मंजूर झाल्यानंतर पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी विशेष बाब म्हणून भडगाव येथे आरटीओ कार्यालय मंजूर करून आणले. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू झाल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.सध्या कार्यालय हे खाजगी जागेत सुरू आहे.

















Leave a Reply