ब्रेकिंग जामनेर : या नरधामाला आमच्या तब्यात द्या म्हणत केली संतप्त जमावाणे दगडफेक व जाळपोळ

जामनेर -तालुक्यातील चिंचखेडा येथील चिमुकलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमाला भुसावळ शहरातून अटक केली होती दरम्यान या आरोपीला ताब्यात देण्याच्या मागणीसाठी संतप्त जमा करून जामनेर शहरात रास्ता रोको आंदोलन करत जाळपोळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी २० जून रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली आहे. जामनेर तालुक्यातील चिंचखेडा गावातील सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिचा निर्दयपणे खून करण्यात आल्याची घटना मंगळवार ११ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता उघडकीला आली होती. या घटनेतील संशयित आरोपी संशयीत आरोपी सुभाष इमाजी भिल वय-35 रा. चिंचखेडा ता. जामनेर तेव्हापासून फरार झाला होता. याबाबत जामनेर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. अखेर स्थानिक गुन्हे शाखा आणि भुसावळ पोलिसांच्या मदतीने गुरुवार २० जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता भुसावळ शहरातील तापी नदी परिसरातून अटक केली होती. दरम्यान संशयित आरोपीला अटक झाल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांसह समाजबांधवांनी जामनेर शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी ६ वर्षे मुलीवर अत्याचार करून तिचा खून करणारा आरोपीला ताब्यात देण्याच्या मागणीसाठी संतप्त जमावाकडून जामनेर शहरात ठीकठिकाणी जाळपोळ करण्यात आली तर जमावाकडून जामनेर पोलीस ठाण्यावर दगडफेक करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक मा. महेश्वर रेड्डी हे रात्री अकरा वाजेच्या सुमारास दंगा नियंत्रण पथक व आपल्या ताफ्यासह दाखल झाले त्यांनी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी खूप प्रयत्न केला मात्र परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला तरीही जमाव शांत होत नसल्याचे पाहून सरतेशेवटी हवेत १० ते १२ फैरी झाडल्यावर परिस्थिती आटोक्यात आली. असून जामनेर शहरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे. या संतप्त जमावाच्या दगडफेकीत पोलीस निरीक्षक मा. किरण शिंदे त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी हितेश महाजन, कुंभार, सुनील राठोड, आर।
एस. कुमावत, संजय खंडारे, प्रितम बारकाले हे जखमी झाले असून पोलीस अधीक्षक मा. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक मा. अशोक नखाते, गुन्हा शाखेचे वरिष्ठ निरीक्षक मा. बबनराव आव्हाड, पाचोरा उप विभागीय पोलीस अधिकारी मा. धनंजय वेरुळ यांच्या मार्गदर्शनाखाली
गुन्हा शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे व त्यांचे सहकारी करत असून जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. किरण शिंदे व त्यांचे सहकारी परिस्थितीवर लक्ष्य ठेवून आहेत..

















Leave a Reply