प्रतिनिधी- तुषार मारुती केंगार
सोलापुर
पीपल्स रिपब्लिकन पार्टी-PRP च्या वतीने वर्ष 2024 चा माळशीरस 254, विधानसभा मतदारसंघ, माळशिरस चा अधिकृत उमेदवार जाहिर
येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टी-PRP , राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा. जोगेंद्रजी कवाड़े सर यांच्या आदेशानुसार , PRP चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भाई जयदीप जी कवाड़े यांनी – पीपल्स रिपब्लिकन पार्टी-PRP चे युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथजी भोसले यांच्या नावाची घोषणा मुंबई येथील पीपल्स रिपब्लिकन पार्टी-PRP च्या मुख्यालय येथे जाहिर केली , त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टी-PRP, निवडणुकीचे रींगन चांगलेच गाजवणार हे नक्की .. उमेदवार निश्चित करते वेळी प्रदेश कार्यकारणी चे सर्व वरिष्ठ नेते मंडळी उपस्थित होते , माळशिरस विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक लढवण्यासाठी माळशिरस तालुक्यातील शिष्टमंडळाच्या मागणीला राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे यांनी मान्य करून आंबेडकरी चळवळी तील आक्रमक , लढाऊ नाव असणारे नेते PRP चे युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथजी भोसले साहेब यांच्या नावाची घोषणा केली. .
जयदीप भाई कवाडे यांच्या घोषणेनंतर माळशिरस तालुक्यातील् सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे .