Advertisement

चाळीसगाव :- एकाच नात्यातील असल्यामुळे घरच्यांचा नाकार प्रेमयुगलाने घेतला टोकाचा निर्णय

चाळीसगाव  :- एकाच नात्यातील असल्यामुळे घरच्यांचा नाकार प्रेमयुगलाने घेतला टोकाचा निर्णय

चाळीसगाव  :- रेल्वेस्थानकावरून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धावत्या रेल्वेखाली झोकून देत प्रेमीयुगलानं आत्महत्या केली. या घटनेत मुलीचा मृत्यू झाला असून, मुलाचे पाय कापल्या गेल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी येथील रेल्वे पोलिसांत नोंद झाली आहे. याबाबत असे की, चाळीसगाव तालुक्यातील बोढरे येथील रिक्षाचालक सचिन गणपत चव्हाण (वय २२) याचे गावातील त्याच्याच जवळच्या नात्यातील मुलीशी प्रेमसंबंध होते. दोन्हींनी लग्नाचा विचारही केला होता. मात्र, ते एकाच नात्यातील असल्याने त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला. आपले लग्न होणार नसल्याचे त्यांनी आत्महत्या करण्याचे ठरविले. त्यानुसार गुरुवारी (ता. ६) रात्री दोन्हींनी गावातून पलायन केले व चाळीसगाव गाठले. बोढरे येथे रात्री मुलगी घरी न परतल्याने तिच्या घरच्यांनी तिचा शोध सुरू केला. मात्र, मुलगी कुठेही मिळून आली नाही. दरम्यान, घरून पळून गेलेले सचिन व शीतल यांनी चाळीसगाव रेल्वेस्थानकावर येऊन रात्री दीडच्या सुमारास धावत्या रेल्वेखाली स्वतःला झोकून दिले. यात शीतलचा जागीच मृत्यू झाला. सचिनचा मात्र एकच पाय रेल्वेखाली सापडल्याने तो कापला गेला. रेल्वे निघून गेल्यानंतर सचिनने जखमी अवस्थेत त्याच्या मोबाईलवरून बोढरेत भावाला कळवले. त्यानंतर त्याच्या नातलगांसह इतरांनी चाळीसगावला धाव घेऊन जखमी सचिनला खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्या दुसऱ्या पायावर शस्रक्रिया करण्यात आल्याचे सांगण्यात आले. याबाबत स्टेशन मास्तरांनी रेल्वे पोलिसांना दिलेल्या माहितीवरून नोंद झाली आहे. हवालदार गोपालकृष्ण सोनवणे तपास करीत आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!