Advertisement

भडगांव ब्रेकिंग : वीज कोसळून बैलाचा जागीच मृत्यू…

भडगांव ब्रेकिंग : वीज कोसळून बैलाचा जागीच मृत्यू…

भडगांव : दि. 12 जून बुधवार रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भडगाव तालुक्यातील वाडे येथील श्री. सूर्यकांत रामदास चौधरी यांच्या शेतात अचानक वीज कोसळून बैल ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शेतकरी सूर्यकांत चौधरी यांनी निंबाच्या झाडाखाली बैल जोडी बांधले असता त्यातील एका बैलावर वीज पडल्याने एका बैल जागीच मृत्यूमुखी पडला शेतकरी सूर्यकांत चौधरी यावेळी समोर असणाऱ्या पत्राच्या शेडमध्ये आडोशाला बसले होते मुला बाळाप्रमाणे जपलेल्या बैलाचा स्वतःच्या डोळ्यादेखत वीज पडून बैलाचा मृत्यू झाल्याने त्यांच्यावर संकट ओढले आहे बैल मृत्युमुखी पडल्याने त्यांचे सुमारे 60 ते 70 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे सध्या मशागतीचे कामे चालू असताना बैल मृत्युमुखी पडल्याने शेतकऱ्याचा शोक अनावर झाला. यासाठी या शेतकऱ्याला शासकीय नुकसान भरपाई मिळावी म्हणून तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकारी,तलाठी,ग्रामसेवक, पोलीस पाटील,सरपंच यांनी ताबडतोब पंचनामा करून शेतकऱ्यास आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी वाडे ग्रामस्थांकडून होत आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!