Advertisement

जामनेर धक्कादायक : ब्रेकिंग! 6 वर्षीय बालिकेवर अत्याचार आणी ….

धक्कादायक : ब्रेकिंग! 6 वर्षीय बालिकेवर अत्याचार आणी ….

जामनेर  तालुक्यातील चिंचखेडा बु॥ येथे ६ वर्षीय बालिकेवर अत्याचार करत केला खुन,आरोपी फरार. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा शिवारातील चिंचखेडा गावठाण हद्दीत काही आदिवासी कुटुंब रहातात हे मोलमजुरी करणारे कुटुंब असल्याने आता पेरणीचे दिवस सुरु असल्याने सहा वर्षीय अल्पवयीन मुलीला घरी सोडून मुलीचे आईवडील कामानिमित्ताने दुसरीकडे गेले होते. मुलगी घरी एकटीच असल्याचा फायदा घेत शेजारीच रहात असलेल्या एका पस्तीस वर्षीय नराधमाने त्या अल्पवयीन मुलीला तुला खायला खाऊ घेऊन देतो असे सांगून सोबत घेऊन गेला व दुकानातून काही खायची वस्तू घेऊन त्या मुलीला गोड बोलून चिंचखेडा बुद्रुक गावाजवळील एका केळीच्या मळ्यात नेऊन तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करुन नंतर तीला जीवे ठार मारुन पुरावे नष्ट केल्याची घटना काल दिनांक ११ जून २०२४ मंगळवार रोजी सायंकाळी 7 वाजता उघडकीस आली आहे. या पीडित अल्पवयीन मुलीचे आईवडील सायंकाळी कामावरुन घरी आल्यावर त्यांनी मुलीला घरात पाहिले घरात मुलगी दिसली नाही म्हणून त्यांनी आसपासच्या शेजाऱ्यांना विचारपूस केली मात्र मुलगी सापडली नाही तेव्हा त्यांनी गावकऱ्यांना ही घटना सांगितली तेव्हा गावकऱ्यांनी मुलुचा सगळीकडे शोध घेतला असता ती मुलगी एका केळीच्या मळ्यात मृत अवस्थेत आढळून आली गावकऱ्यांनी तातडीने जामनेर पोलीस स्टेशनला घटनेविषयी सविस्तर माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत सविस्तर माहिती जाणून घेत मृत मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असल्याचे समजते तसेच या घटनेनंतर अधिक तपास केला असता याच वस्तीतील एक 35 वर्षीय तरुण बेपत्ता झाला असल्याचे दिसून आले. तसेच मुलीचा मृतदेह व घटनास्थळ पाहीला असता मयत मुलीवर अत्याचार करुन तीला मारुन टाकले असावे असा अंदाज व्यक्त केला जात असून या घटनेबाबत केकतनिंभोरा, चिंचखेडा बुद्रुक, जामनेर शहर व जिल्हाभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!