भडगाव : 12 वर्ष अल्पवयीन मुलीस दोन युवकांनी….
भडगाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीस दोन तरुणांनी फुस लावून पळून नेल्याची घटना दिनांक 10 जून रोजी दुपारी 12 वाजता हाती आली आहे. भडगाव तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी वय १२ वर्ष ६ महिने ही अँब्रो करायला जाते असे सांगुन घरुन गेली असता दोन युवकांनी दिनांक 7 जून रोजी सायंकाळी 4 वाजता काहीतरी अज्ञात कारणास्तव अल्पवयीन मुलीस फुस लावुन पालकाच्या कायदेशिर रखवालीतुन पळुन नेले म्हणुन मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून संशयित दोन आरोपी तरुणांविरोधात भडगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक 8 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून अल्पवयीन मुलगी आज पर्यंत मिळून न आल्याने तिचा शोध भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार हिरालाल पाटील हे करीत आहेत. अल्पवयीन मुलीचे वर्णन, रंग गोरा, उंची ४ फुट ८ इंच, अंगात पांढ-या रंगाचे टॉप व लाल रंगाची लेगीज पॅन्ट, पायात पाढ-या रंगाची सैन्डल घातलेली. चेहरा लांब केस काळे नाकात फुली असा आहे.


















Leave a Reply