सत्यार्थ न्यूज रिपोर्टर:- किरण माळी
जळगांव महाराष्ट्र
जिल्ह्यात मे महिन्यात ५१ महसूली मंडळात होते सलग ४५ अंश तापमान
५१ महसूल मंडळातील पात्र शेतकऱ्यांना मिळणार ४३ हजारांची भरपाई !
जळगाव (प्रतिनिधी, ९ मे) – यंदाचा उन्हाळा अतिशय कडक होता. यंदा मे महिन्यात सलग पाच दिवस ४५ अंशांपेक्षा अधिक तापमान होते. यामुळे शेतकऱ्यांसह सर्वच जण अती तापमानाने हैराण झाले होते. त्याचा फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकांना बसला होता. केळी उत्पादकांना अती तापमानात जर सलग तीन दिवस ४५ अंश तापमान राहिले तर त्यांना नुकसान भरपाई शासन देते. यंदा तापमानाच्या निकषात जिल्ह्यातील ५१ महसूल मंडळे पात्र ठरली आहे. सलग पाच दिवस ४५ अंश तापमान राहिल्यामुळे ५१ महसूल मंडळातील केळी उत्पादक शेतकरी ४३ हजार ५०० रुपयांच्या नुकसान भरपाईच्या रक्कमेसाठी पात्र ठरले आहेत.
या आधी एप्रिल महिन्याच्या जास्त तापमानाच्या निकषात ७५ महसूल मंडळ पात्र ठरले होते. तर कमी तापमानाच्या निकषात ३६ महसूल मंडळ २६ हजार ५०० रुपयांच्या नुकसानभरपाईसाठी पात्र ठरले आहेत.
पात्र महसूल मंडळे अशी
जळगाव तालुक्यातील असोदा, नशिराबाद, भोकर, म्हसावद, पिंप्राळा. भडगाव तालुक्यातील भडगाव, कोळगाव. चाळीसगाव तालुक्यातील खडकी बू., शिरसगाव. धरणगाव तालुक्यातील धरणगाव, पाळधी, पिंप्री, साळवा, सोनवद. एरंडोल तालुक्यातील एरंडोल, कासोदा, रिंगणगाव, उत्राण गृह. अमळनेर तालुक्यातील अमळनेर, अमळगाव, भरवस, मारवड, नगाव, पातोंडा, शिरूड, वावडे. पाचोरा तालुक्यातील कु-हाड बु., पाचोरा. पारोळा तालुक्यातील बहादरपूर, पारोळा,शेळावे, तामसवाडी.भुसावळ तालुक्यातील वरणगाव, चोपडा तालुक्यातील चोपडा, अडावद, चहार्डी, गोरगावले, हातेड बु., लासुर. जामनेर तालुक्यातील जामनेर, नेरी बु., शेंदुर्णी. मुक्ताईनगर तालुक्यातील कु-हे, मुक्ताईनगर. रावेर तालुक्यातील ऐनपुर, खानापूर, खिर्डी बु., खिरोदा, निंभोरा बु., रावेर, सावदा.
कोट..
यंदा जिल्ह्यात प्रचंड उष्णतेची लाट होती. विशेष करुन एप्रिल व मे महिन्यात तापमान प्रचंड वाढले. मे महिन्यात तापमान ४५ अंशापर्यंत गेल्यामुळे केळीला मोठ्या प्रमाणात फटका बसला. केळीचे नुकसान झाले. सलग पाच दिवस तापमानाचा पारा ४५ अंशापेक्षा वर गेल्यामुळे जिल्ह्यातील ५१ महसुल मंडळ हवामानावर आधारीत फळ पीक विमा योजनेतंर्गत जास्त तापमानाच्या निकषात पात्र ठरली आहेत. त्यामुळे या महसुल मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ४३ हजार ५०० रुपयांची नुकसानभरपाईची रक्कम मिळणार आहे.-
ना. गुलाबराव पाटील, पालकमंत्री, जळगाव जिल्हा