ब्रेकिंग भडगांव : तालुक्यात पसरली शोककळा…
रशियात शिक्षणासाठी गेलेल्या भडगाव येथील हर्षल संजय देसले वय १९ या विद्यार्थ्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून याच घटनेत महाराष्ट्रातील अजून 5 तरुण विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती आज दिनांक 6 जून गुरुवार रोजी सकाळी 8 वाजता हाती आली आहे. भडगाव तालुक्यातील वाक हे मुळगाव असलेले मात्र हल्ली मुक्काम भडगाव शहरातील यशवंत नगर भागातील वीट भट्टी चालक संजय देसले यांचा तो एकुलता एक मुलगा होता. ही घटना मंगळवारी दिनांक 4 जून रोजी रात्री 11 वाजता घडली. हर्षल याच्या घरी दिनांक 5 जून रोजी याबाबत विद्यापीठाकडून निरोप देण्यात आला होता. तसेच याच घटनेत महाराष्ट्रातील एकूण 5 जणांचा दुर्दैव मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. हर्षल हा 6 महिन्यांपूर्वीच रशियात एमबीबीएसच्या शिक्षणासाठी गेला होता. मंगळवारी रात्री ८:३० वाजता त्याने संपर्क साधला होता. यानंतर त्याचा मोबाइल बंद झाला. सकाळी विद्यापीठाकडून या घटनेची माहिती भडगाव येथे परिवाराला कळविण्यात आल्याची माहिती हर्षलचे काका राजेंद्र देसले यांनी दिली. तसेच त्याचे पार्थिव हे रशियावरून अजून भडगांव येथे पोहोचले नसून एअर ॲम्बुलन्स ने एक ते दोन दिवसात पोहचेल. हर्षल हा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे. भडगाव तालुक्यात शोकाकळा पसरली आहे.