Advertisement

पाचोरा : आचारसंहितेचा भंग केल्यास कायदेशीर कठोर कारवाई, पोलीस निरीक्षक मा. श्री. अशोक पवार.

पाचोरा : आचारसंहितेचा भंग केल्यास कायदेशीर कठोर कारवाई, पोलीस निरीक्षक मा. श्री. अशोक पवार.

 

लोकसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणूका शांततेत पार पडल्या असून उद्या दिनांक ०४ जून २०२४ मंगळवार रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जाणार आहेत. या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशवासीयांचे लक्ष लागले असून या निवडणुकीच्या कालावधीत कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दिनांक १६ मार्च २०२४ शनिवार पासून ते ०६ जून २०२४ गुरुवारपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

उद्या दिनांक ०४ जून २०२४ मंगळवार रोजी निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्याही नागरिकाने सोशल मीडियाचा वापर करुन फेसबुक, इंस्ट्राग्राम, व्हाट्सअप व इतर एप्लिकेशन्सच्या माध्यमाद्वारे कोणत्याही जाती, धर्माच्या भावना दुखावल्या जातील अशा स्वरूपाचे मजकूर, पोस्ट, कमेंट्स, स्टोरी, व्यंगचित्र, डिजिटल बॅनर टाकू नयेत. तसेच कुणाच्याही विरोधात घोषणाबाजी, विनापरवानगी मिरवणूक काढणे, विनापरवानगी वाद्य वाजवणे, फटाक्यांची आतिषबाजी करणे, सामाजिक तेढ निर्माण होईल असे कृत्य करु नये असा गैरप्रकार कुणीही केल्यास सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्यासह गृप अॅडमिनवर तसेच कायदा हातात घेणाऱ्यांची गय न करता कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. अशोक पवार यांनी दिला आहे.

तसेच सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या सर्व गृप अॅडमीनने आपल्या गृपवर कुणीही वादग्रस्त पोस्ट टाकणार नाही याची काळजी घ्यावी किंवा आचारसंहिता कालावधीत गृपची सेटिंग बदलवून ओन्ली अॅडमीन असा बदल करुन सहकार्य करावे म्हणजे आपल्या गृपवर कुणीही वादग्रस्त पोस्ट करु शकणार नाही.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!