पाचोरा : ब्रेकिंग! अपघात अन संवेदनशील आमदार साहेब….
पाचोरा मतदारसंघातील जनतेला दिसून आली की पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांची संवेदनशीलता. अपघातग्रस्ताला आपल्या शासकीय वाहणात घेऊन तात्काळ रुग्णालयात केले रवाना. आज दिनांक 2 जून रोजी दुपारी 3:30 वाजता आमदार किशोर आप्पा पाटील यांचा पाचोरा तालुक्यातील शिंदाड भागात दौरा असताना त्याचे वाहन राजुरी ते शिंदाड रस्त्यावरून जात होते तेव्हा तेथील एका वळणाावर दुचाकी रस्त्याखालील खोलगट भागात पडलेली दिसून आली तर दुचाकीस्वार गंभीर जखमी अवस्थेत तेथे पडलेला दिसताच आमदार किशोर आप्पा पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ अपघातग्रस्थाच्या मदतीला धावले, त्याला उचलत आपल्या शासकीय वाहणात घेऊन पाचोरा रुगणालयाकडे रवाना केले त्यावेळी आमदार किशोर पाटील साहेब व सोबत असलेेले पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच पोलीस बांधवांनी मदत कार्य केले. सदर इसम हा 40 ते 45 वयोगटातील आहे, तरी गंभीर जखमी इसमाची ओळख पटू शकलेली नाही. आमदाराच्या कृतीने या रस्त्याने येणार जाणारा प्रवाशी उन्हाने भाराउन गेलेेला होता.