: प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
दहावी व बारावी बोर्ड परिक्षेत न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय लाडगाव चे घवघवीत यश
लाडगाव .
न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय लाडगाव दहावी बोर्ड परिक्षेत 97.10 % निकाल लागला आहे.तसेच बारावी (कला) बोर्ड परिक्षेत 92.50 % निकाल लागला आहे.
एस.एस.सी. बोर्ड परिक्षेत एकुन 138 विद्यार्थी बसले होते. यात विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थी 30,प्रथम श्रेणी प्राप्त विद्यार्थी 58,द्वितीय श्रेणी प्राप्त विद्यार्थी 46 आहेत.
एस.एस.सी .बोर्ड परिक्षेत प्रथम क्रमांक कु.साक्षी वाल्मिक डोंगरे 91% ,द्वितीय क्रमांक कु.स्वप्नाली सुखदेव थोरे 89.60%, तृतीय क्रमांक कु.श्रद्धा ज्ञानेश्वर फुकटे 88.20% प्राप्त झालेत.
बारावी (कला) बोर्ड परिक्षेत महाविद्यालयात प्रथम क्रमांक कु.लकारे साक्षी भाऊसाहेब 71.33%,द्वितीय क्रमांक कु.पठाण निशाद दौलत 69%,तृतीय क्रमांक कु. कौसे सोनाली आप्पासाहेब 68.67% प्राप्त झालेत.
सर्व गुणवंत यशवंत विद्यार्थ्यांचे शालेय समिती अध्यक्ष श्री.सत्यजित पाटील सोमवंशी व सर्व शालेय समिती सदस्य ,मुख्याध्यापक श्री.पी. यु .जाधव सर व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थी यांचे कौतुक केले.