Advertisement

पाचोरा-मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत राजुरी बु.शाळेला पाचोरा तालुक्यातून प्रथम क्रमांक

http://satyarath.com/

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत राजुरी बु.शाळेला पाचोरा तालुक्यातून प्रथम क्रमांक

रिपोटर चेतन सरोदे /प्रभाकर सरोदे

वरखेडी ता पाचोरा वार्ताहार- मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा प्राथमिक विद्या मंदिर राजुरी बु या पाचोरा
पाचोरा तालुक्यातुन प्रथम क्रमांक मिळविला या कार्यक्रमाचे आयोजन सरदार एस. के. पवार माध्यमीक विद्यालय नगरदेवळा येथे माणनीय गटविकास अधिकारी समाधान पाटिल पाचोरा पस यांच्या अध्यक्षतेखाली
संपन्न झाली शैक्षणिक वर्ष सन 2023-24, या वर्षात दिनांक 1

जानेवारी 2024 ते 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत 45 दिवसांचा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेचं राज्यभरातील सर्व जिल्हा परिषदा व खाजगी शाळांमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते यामध्ये 45 दिवस विविध उपक्रम राबवून त्या उपक्रमांचे डॉक्युमेंटेशन ऑनलाइन व ऑफलाइन या पद्धतीने करावयाचे होतं. यामध्ये भरघोस अशा रोख रकमेचे बक्षीस शासनाने ठेवलेली होती या उपक्रमात पाचोरा तालुक्यातील सर्वच शाळांनी सहभाग नोंदवलेला होता व प्रत्यक्ष प्रेझेंटेशन आणि उपक्रमाची केलेली कार्यवाही याचे परीक्षण करण्यासाठी कमिट्या नेमण्यात आलेल्या होत्या या कमिटेत पाचोरा तालुक्यातील वरखेडी केंद्रातील जिल्हा परिषद मराठी शाळा राजुरी बु. या शाळेने तालुकास्तरीय प्रथम क्रमांक पटकावून बक्षीस मिळवले आहे प्रथम क्रमांकाचे तालुकास्तरीय बक्षीस हे तीन लाखाचे होते मात्र सारखे गुण मिळाल्यामुळे परीक्षणासाठी आलेली कमिटी माननीय गटशिक्षणाधिकारी समाधान पाटील साहेब शालेय पोषण आहार अधीक्षक सरोज गायकवाड मॅडम तसेच वाडी केंद्राचे केंद्रप्रमुख नितीन भालेराव सर या तिघांनी तालुकास्तरीय प्रशिक्षण करून जिल्हा परिषद होळ शाळा व जिल्हा परिषद राजुरी बु. शाळा या दोन्ही शाळांचे समान गुण असल्यामुळे यांना प्रथम क्रमांक हा विभागून दिला तीन लाखाचे बक्षीस दीड- दीड लाख रुपये या प्रकारे विभागून देण्यात आलं. राजुरी शाळेने मिळवलेल्या या यशाबद्दल बद्दल सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे 45 दिवसांचे हे उपक्रम राबवण्यासाठी शाळेतील शिक्षक मुख्याध्यापिका अरुणा उदावंत उपशिक्षक योगेश जाधव तसेच नूतन चौधरी अंगणवाडी ताई मालू ताई शालिक पाटील त्याचबरोबर बालू गोविंदा पाटील प्रल्हाद गोविंदा पाटील अध्यक्ष प्रवीण बापूराव पाटील उपाध्यक्ष बापूराव पाटील शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सब्र शेखलाल पाटील रेखा प्रताप पाटील अरुण सांडू पाटील सत्तार पटेल कविता भाऊसा पवार अनिल पवार आशा सलीम पटेल व शाळेचे माजी विद्यार्थी या सर्वांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेला सहकार्य केले व या सर्वांच्या सहकार्याने त्याचबरोबर वरखेडी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री राहुल पाटील केंद्रीय मुख्याध्यापक श्री विजय महाजन पाचोरा तालुक्याचे सन्माननीय गटशिक्षणाधिकारी श्री समाधान पाटील शालेय पोषण आहार अधीक्षक तसेच पिंपळगाव बिटविस्तार अधिकारी सरोज गायकवाड मॅडम संपूर्ण बी आर सि टीम केंद्रस्तर परीक्षणासाठी आलेले हरि नानकर दादा घुसर्डी शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर त्याचबरोबर केंद्रप्रमुख मोरानकर दादा या सर्वांचे अनमोल असे मार्गदर्शन मिळाले शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वृंद यांनी प्रत्यक्ष राबविलेल्या उपक्रमांचे ऑनलाईन डॉक्युमेंटेशन शाळेचे उपशिक्षक श्री योगेश जाधव सर यांनी उत्कृष्टरित्या केले तसेच प्रत्येक उपक्रमाचे व्हिडिओचे क्यूआर कोड तयार करून त्याद्वारे उत्तम असं प्रेझेंटेशन तालुकास्तर कमिटी त्याचबरोबर जिल्हास्तर कमिटी समोर देखील करण्यात आला या स्पर्धेचे बक्षीस वितरण आज दिनांक एक मे 2024 रोजी सरदार एस के पवार माध्यमिक विद्यालय नगरदेवळा येथे माननीय गटशिक्षणाधिकारी समाधान पाटील साहेब शिक्षण विस्तार अधिकारी सरोज गायकवाड मॅडम तालुक्यातील सर्व केंद्रांचे केंद्रप्रमुख तसेच गटविकास अधिकारी स्नेहल शेलार मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले

https://satyarath.com/

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!