वाऱ्यामुळे पुढील तीन दिवस तापमानाच्या वाढीचे
रिपोटर चेतन सरोदे /प्रभाकर सरोदे
चाळीसगाव तालुक्यात रात्री झालेल्या पावसानंतर दोन दिवस तापमान ४२ अंशाच्यावर गेल्याने उन्हाचे चटके जाणवू लागले होते. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामूळे तापमानाचा पारा खाली उतरून ४१ अंशावर आल्याने उन्हाच्या चटक्यांपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान पुढील आठवड्याभरात उष्णतेच्या लाटेसह हलक्या पावसाचाही अंदाज हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे. तापमानाचा पारा ४१ अंशावर स्थिरावला असला तरी त्यात गेल्या बुधवारी वाढ होऊन कमाल तापमान ४२ अंशाची नोंद करण्यात आली होती.


















Leave a Reply