Advertisement

मिरज मधील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात झाली चिमुकलीवर यशस्वी एन्डोस्कोपी: घशात अडकलेलं नाणे काढले बाहेर: डॉ प्रशांत दोरकर आणि टीम यांनी केली अवघड एन्डोस्कोपी

मिरजेतील शासकीय रुग्णालयात येथील निष्णात धन्वंतरी मंडळींनी एन्डोस्कोपी च्या साह्याने अर्थात शुद्ध मराठी भाषेत दुर्बिणीच्या साह्याने एक अवघड अशी शस्त्रक्रिया लीलया पार पाडली तीही कोणतेही टाके न घालता किंवा चिरफाड न करता. होय मिरजेतील शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे येथील डॉक्टर मंडळींनी ही कमाल केले असून पाच वर्षाच्या चिमुकलीवर ही अवघड एन्डोस्कोपी करण्यात डॉक्टर मंडळींना यश आले आहे. येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रुपेश कुमार शिंदे यांनी दिली ते म्हणाले, या चिमुकलीवर यापूर्वी ओपन हार्ट ची शस्त्रक्रिया झाली होती तिला रक्त पातळ होण्याची औषधे सुरू असताना दिनांक 3 रोजी तिने एक नाणे गिळले ते अन्ननलिकेच्या वरच्या भागात अडकल्याचे दिसून येत होते. त्यांनी येथील शासकीय रुग्णालयात शल्यचिकित्सा शास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे तिच्या नातेवाईक नी दाखल केले. रुग्णावर छोट्या तपासण्या केल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर एन्डोस्कोपी चें सर्जन डॉ प्रशांत श्रीमंत दोरकर शक्यचिकित्सा शास्त्र पथक प्रमुख व त्यांचे सहकाऱ्यांनी वेळ वाया न घालवता या चिमुकलिची एन्डोस्कोपी (दुर्बीणी)करून सदर नाणे काढण्याचा निर्णय घेतला. या रुग्णास भूल देणे खूप जोखमीचे होते. ओपन हार्ट सर्जरी झाल्यामुळे आणि रक्त पातळ होण्याची औषधे चालू असल्यामुळे एन्डोस्कोपी आमच्या दृष्टीने खूप इंडॉस्कॉपी आमच्या दृष्टीने खूप गुंतागुंतीची होती. मात्र आमच्या तज्ञ डॉक्टर मंडळींनी आणि त्यांच्या सहकार्यानी नाणे काढण्याची ही इंडॉस्कॉपी शस्त्रक्रिया अत्यंत चांगली पार पाडली.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!