सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या आयुक्त संजिता मोहापात्र यांनी आज अचानक त्यांच्या खास शैलीमध्ये महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयाला भेट देत विभागप्रमुखांचे रजिस्टर तपासणी केले. सहायक आयुक्त अनिस मुल्ला यांनी त्यांचे स्वागत करून आवश्यक कागदपत्रे मागणीप्रमाणे त्यांना सादर केली मात्र त्यांच्या या भेटीमुळे कार्यालयीन कर्मचाऱ्यांमध्ये मात्र पळापळ पहायला मिळाली. प्रथमतः त्यांनी कार्यालयात येताच घरपट्टी विभागातील कर्मचाऱ्यांना स्वतःचे ओळखपत्र गळ्यात नसल्याबद्दल विचारणा केली तर सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांची हजेरी स्वतः त्यांनी घेत येथील हलचाल रजिस्टर मागवून घेतले. त्यांनी तडक उपायुक्त स्मृती पाटील यांचे दालन गाठले यावेळी उपायुक्त स्मृती पाटील या कामानिमित्त बाहेर असल्याचे त्यांना संबंधित त्यांच्या दालनाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले त्यानंतर त्यांनी सहा आयुक्त अनिस मुल्ला याना मिरजेतील सर्व विभाग प्रमुखाच्या उपस्थिती बाबत विचारले मात्र मुल्ला यांनी सर्वाना दूरध्वनी द्वारे कार्यालयात आयुक्त मॅडम आल्याच्या कल्पना दिल्या. नेहमी प्रमाणे या मिरज विभागीय कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची तारांबळ मात्र उपस्थित नागरिकांनी अनुभवली. यावेळी नगरसेविका सौ अपर्णा शेटे यांनी त्यांना महापालिकेसमोर असलेल्या त्यांच्या संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट देण्यासाठी आमंत्रित केले त्यानंतर वेळात वेळ काढून आयुक्त मोहापात्र यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयास भेट दिली त्यावेळी शेटे कुटुंबाने त्याने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी नगरसेविका सौ अपर्णा शेटे यांनी प्रभाग चार मधील नियमित कचरा उठाव तसेच स्वच्छता आणि रस्त्यावरील (स्ट्रीट लाईट) विद्युत दिव्यांच्या बाबतीत असेलेली अनियमितता आणि भटक्या कुत्र्यांची समस्या या विषयी चर्चा केली असता या सर्व बाबी आपल्याला माहिती असून लवकरच चांगल्या प्रकारे सर्व समस्यांचा निपटारा आपण करूया असे आश्वासन आयुक्त मोहापात्र यांनी नगरसेविका सौ अपर्णा शेटे याना दिले. प्रभागातील सर्व समावेशक गोष्टींवर आज आयुक्त संजिता मोहापात्र यांच्याशी आमची चर्चा झाल्याचे नगरसेविका सौ अपर्णा विवेक शेटे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. उद्योजक विवेक शेटे यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी उद्योजक आशिष शेटे आणि अथर्व शेटे उपस्थित होते.Website: http://satyarath.com/wp-admin
Leave a Reply