प्रतिनिधी सुधीर गोखले
नुकतीच मिरज सुभाषनगर रस्त्यावर दोन रिक्षांच्या अपघातामध्ये चार विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर उप-पादेशिक परिवहन विभागाने जिल्ह्यामध्ये अवैध पद्धतीने खाजगी गाड्यांमधून विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर जोरदार कारवाई सुरु केली आहे . काही खाजगी गाड्यांच्या वेगावर वाहनचालकांचे नियंत्रण नसते परिणामी अपघातांना सामोरे जावे लागते सांगलीमध्ये उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांच्या निर्देशानुसार उप-प्रादेशिक परिवहन कार्यालायातील अधिकाऱ्यांनी चार चाकी वाहनांची विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. यासंदर्भात आमच्या प्रतिनिधींनी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले,जिल्ह्यामध्ये अवैध पद्धतीने विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या चार चाकी आणि तीन चाकी वाहनांच्या बाबतीत आम्ही विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे यामध्ये आज पर्यंत ११ नियमबाह्य वाहनांवर कारवाई आम्ही केली आहे. या विशेष तपासणी मोहिमे अंतर्गत अपुरे कागदपत्र क्षमते पेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक तसेच सुरक्षा नियमांचे उल्लंघन अधिकृत परवाना नसताना वाहतूक आदी बाबी आढळून आल्या अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही आमची हि मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. आमच्या विभागाने पालक आणि शाळांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षितते बाबत नेहमी सतर्क राहण्याचे आवाहन केले जाते. विद्यार्थ्यांची शाळेमधून त्यांच्या घरी ने आण करण्यासाठी वाहनांना अधिकृत स्कुल बस चा परवाना आहे का याची खात्री पालकांनी करून घ्यावी शाळा प्रशासनाने देखील शालेय परिवहन समितीतर्फे वाहतूक व्यवस्थेबाबत नियमित आढावा घ्यावा असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. अधिकृत परवाना असल्याशिवाय शाळा आवारात वाहनांना परवानगी देऊ नये. यापुढे हि तपासणी मोहीम आम्ही तीव्र करणार आहोत. अधिकृत परवाना धारक वाहनांनी आपली आवश्यक कागदपत्रे आपल्या वाहनांसोबत ठेवावीत.
Leave a Reply