Advertisement

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर; दौऱ्यासाठी जय्यत तयारी; उद्या कृतज्ञता सभेचे आयोजन

प्रतिनिधी सुधीर गोखले
आजपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दोन दिवसीय कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा असून साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवस्थान विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मंजूर १५०० कोटी रुपयांचा निधी झालेबद्दल मानती शाह आणि सरकारचे आभार मानण्यासाठी कृतज्ञता मेळावा सभेचे आयोजन जिल्हा भाजप आणि महायुती तर्फे शनिवारी होत आहे. या सभेमध्ये ते मार्गदर्शन करतील. त्याचप्रमाणे त्यांच्या हस्ते करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवस्थान परिसरातील विकासकामांचे उदघाटन होत आहे. या त्यांच्या दौऱ्याची व्यवस्था आणि सभेच्या ठिबकची पहाणी करण्यासाठी महायुतीमधील प्रमुख नेते पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अधिकारी (मंत्री दर्जा) राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्यासह महायुतीतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. शनिवारी होणाऱ्या या सभेच्या तयारीची पाहणी उपस्थित मान्यवरांनी केली यावेळी खासदार धनंजय महाडिक म्हणाले जवळ जवळ १८ ते २० हजार नागरिकांची उपस्थिती अपेक्षित असून पोलीस परेड मैदानावर भव्य मंडप उभारण्यात आला आहे. पार्किंग साठी स्वतंत्र व्यवस्था असणार आहे. या सभेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना चंद्रकांत पाटील यांच्यासह महायुती चे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. मंजूर झालेल्या १५०० कोटी पैकी १४० कोटींचा निधी प्राप्त झाला असून या निधीतून विविध विकास कामे प्रगतीपथावर आहेत. या कामांचा औपचारिक शुभारंभ केंद्रीय मंत्री अमित शाह आणि उपस्थिती मान्यवरांच्या हस्ते होईल. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले केंद्रीय मंत्री अमित शाह हे कोल्हापूर चे जावई आहेत त्यामुळे निश्चितपणे त्यांचे भव्य स्वागत महायुती करेल तशी तयारी आम्ही केली आहे. या सर्व तयारीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी घेतला.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!