प्रतिनिधी सुधीर गोखले
मिरजेतील विभागीय कार्यालयाला काल महापालिका आयुक्त संजीता मोहपात्र यांनी सरप्राईज व्हिजिट केली मिरजेतील विभागीय कार्यालय म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था आहे. मिरजेतील नागरिकांचे एकही महत्वाचे काम या कार्यालयात अधिकारी अनुपस्थिती मुळे पूर्ण होत नाही नेहमी कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही विभागातील अधिकाऱ्यांबाबत साहेब सांगलीला मुख्यालयात गेले आहेत मीटिंग आहे’ असे उत्तर ऐकायला मिळते. कालच्या आयुक्त मॅडम यांच्या सरप्राईझ व्हिजिट ने हे कार्यालय काही काळ गोंधळले खरे मात्र त्या गेल्यावर परस्थिती जैसे थे. म्हणजे एखाद्या शाळेमध्ये शिक्षणाधिकारी अचानक व्हिजिट करतात शाळेचे वर्ग पाहतात मुख्याध्यापक खोलीत बसून सर्व शाळा मास्तरांची हजेरी घेतात मस्टर तपासले जाते मात्र उपाययोजना ऐवजी हि व्हिजिट तशीच संपते तास प्रकार कालच्या सरप्राईज व्हिजिट बाबत म्हणावा लागेल. मिरजेतील काही टेबल वरची महिनोन्महिने पडून असलेल्या फाईल वरची धूळ झटकली गेली. जन्म मृत्यू विभाग नागरिकांच्या रांगेमुळे फुल्ल होता. त्यात सर्व्हर डाऊन वेबसाईट बंद. मात्र आयुक्तांनी या समस्येवर उपाय करण्याऐवजी हि व्हिजिट संपवणे यातच धन्यता मानली. त्यांनी जनगणना कामासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांच्या फिल्ड वर भेटी दिल्या. मात्र त्यांच्या या सरप्राईझ व्हिजिट ची चर्चा नागरिकांमध्ये चांगलीच रंगली.
Leave a Reply