Advertisement

ऐन उन्हाळ्यात महाबळेश्वरने ओढली धुक्याची चादर; महाबळेश्वर पर्यटकांनी हाऊसफुल्ल

प्रतिनिधी सुधीर गोखले

थंड हवेचे माहेरघर असलेले महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर मध्ये सध्या पर्यटकांचा ओघ वाढला आहे. संपूर्ण महाराष्ट्राला सध्या उन्हाच्या झळा असहाय्य झालेल्या असताना महाबळेश्वर मात्र धुक्याच्या चादरीमध्ये लपेटले गेले आहे. सायंकाळी बाजारपेठ आणि परिसरामध्ये अत्यंत आल्हाददायक वातावरण सध्या अनुभवायला मिळत आहे. एक आश्चर्याची बाब म्हणजे एन उन्हाळ्यामध्ये येथील तापमान घसरले आहे वेण्णा लेक सह दऱ्याखोऱ्यामध्ये धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरु आहेत हजारो पर्यटकांनी महाबळेश्वर बहरले आहे. शनिवार रविवारी पर्यटकांची वाढती गर्दी पाहायला मिळत आहे. या वातावरणाचा पर्यटक मनमुराद आनंद लुटत आहेत. यामुळे स्थानिक रोजगार जोरात आहे. हॉटेल व्यावसायिक खुश आहेत. पर्यटनाला सध्या सुगीचे दिवस आहेत. वेण्णा लेक मधील नौका विहार, घोडेस्वारी, श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिर, तापोळा रस्त्यावरील नव्याने झालेले विज्ञानगड पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी आहे. धुक्याच्या या चादरीमुळे ऐन उन्हाळ्यात हिवाळ्याचा फील येत आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!