Advertisement

परवाना औषध वाहतुकीचा आणि वाहतूक दारूची; कोल्हापूर सांगली रस्त्यावर उत्पादन शुल्क विभागाची जोरदार कारवाई ४० लाखांचा दारूसाठा जप्त

प्रतिनिधी सुधीर गोखले

औषधे वाहतूक करणारी कागदपत्रे दाखवून भल्या मोठ्या कंटेनर अवैध पद्धतीने लाखो रुपयांची देशी दारू ची वाहतूक कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडली आहे.यामध्ये सुमारे ४० लाख रुपयांची दारू आणि २५ लाख रुपये किमतीचा कंटेनर असा एकूण ६५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत आमच्या प्रतिनिधींशी बोलताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा अधीक्षक स्नेहलता नरवणे म्हणाल्या,’जिल्ह्यामधील अवैध पद्धतीने होत असलेली मद्याची वाहतूक आणि निर्मिती यावर आम्ही विशेष लक्ष ठेऊन आहोत आम्हाला मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार औषध परवाना असलेला मात्र वाहतूक देशी दारूची होणार एक कंटेनर कोल्हापूर सांगली रस्त्यावरून जाणार असल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे मी आमचे सहकारी उपाधीक्षक युवराज शिंदे यांनी आमच्या कर्मचाऱ्यांसह कोल्हापूर सांगली मार्गावरील मजले (ता हातकणंगले) येथे सापळा रचला मिळालेल्या माहितीनुसार एक कंटेनर संशयास्पद वाहतूक करताना आढळून आला आमच्या सहकाऱ्यांसह या कंटेनरच्या चालकाकडे कागदपत्रांची मागणी केली असता त्याने औषध वाहतुकीची कागदपत्रे दाखवली मात्र आम्हाला या कंटेनर बाबत संशय आला आम्ही या कंटेनर ची अधिक तपासणी केली असता जवळजवळ एक हजार देशी दारूचे बॉक्स आढळून आले. या प्रकरणी चालक भोलाराम नरपतराम बिष्णोई (वय २७ भेडा ढाणी पमाना जालोर राजस्थान) यास अटक केली आहे. या कारवाईमध्ये निरीक्षक सदानंद मस्करे दुय्यम निरीक्षक अभयकुमार साबळे, अजय वाघमारे, कांचन सरगर, सचिन लोंढे, विलास पवार आदींचा समावेश होता.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!