Advertisement

महापालिकेतून … सोनखत चोरी प्रकरण; हर्षद शिंदे यांच्याकडून आठ हजार वसूली; कारवाईचा फक्त फार्सच

प्रतिनिधी सुधीर गोखले

काही दिवसांपूर्वी मिरज सुधार समितीने मिरज बेडग रस्त्यावर असलेल्या कत्तलखाना परिसरातील असलेल्या महापालिकेच्या कचरा डेपोमधील सोनखत चोरीचे प्रकरण उघडकीस आणले होते. या प्रकरणी उपायुक्त तथा घकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकारी स्मृती पाटील यांनी हर्षद शिंदे याना ८ हजार रुपयांचा दंड वसूल केला. याबाबत उपायुक्त स्मृती पाटील म्हणाल्या,’हे सोनखत आम्ही निविदा प्रक्रियेनंतर विक्री करत आहे यापुढेही अशीच प्रक्रिया सुरु राहील. मात्र यापूर्वी जे शेकडो टन सोनखत चोरीचे काय त्याची वसुली कोण करणार असाही प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे याबाबत मिरज मधील स्वच्छता स्वच्छता अधिकारी सचिन वाघमोडे यांनी तर या प्रकरणांची माहिती घेऊन अधिक बोलता येईल असे शासकीय उत्तर दिले. मात्र यापूर्वी जी या खताची चोरी झाली यामध्ये किती खत चोरीला गेले याबाबत कोणताही आकडा महापालिकेच्या दफ्तरी नोंद नाही हे विशेष सोनखत चोरीला घन कचरा व्यवस्थापन विभागाचे असणारे ‘व्यवस्थापन’ जबाबदार असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!