Advertisement

सांगली पोलिसांचा महिलांसाठी ‘बडी कॉप’ उपक्रम; ‘आता महिलांनी स्वतःला असुरक्षित समजू नये आम्ही तुमच्या सोबत आहोत’; अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर

प्रतिनिधी सुधीर गोखले

सांगली जिल्ह्यातील नोकरदार महिलांसाठी विशेष पोलिसिंग सुरु झालंय आता महिलांनी बिनधास्त आपल्या नोकरीच्या ठिकाणी जावे. आता सांगली पोलीस दलाने महिलांसाठी पोलीस मैत्रीण उपक्रम सुरु केला असून संकटकाळात आपल्या मोबाईल वरून एका क्लिक वर आपल्या साठी महिला पोलीस मैत्रीण धावून येईल. अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या हस्ते या उपक्रमाचे उदघाटन औद्योगिक वसाहती मध्ये संपन्न झाले. यावेळी संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश कदम महिला कक्षाच्या सहाय्य्क निरीक्षक मेघा पाटील, औद्योगिक वसाहतीचे उपाध्यक्ष विजय भगत, संचालक शैलेंद्र केळकर, सुरेश इरळी, उपस्थित होते. याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक बारवकर म्हणाल्या,’राज्यातील मोठ्या शहरांमधून महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देण्यासाठी बडी कॉप हा उपक्रम राहय पोलीस दलाने सुरु केला आहे.पुण्यातील महिलांच्या खुनाची दखल घेत हा उपक्रम सुरु झाला आहे. त्या पुढे म्हणाल्या,’प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नोकरदार महिलांचा व्हाट्स अप ग्रुप बनवला जातो. या ग्रुप मध्ये १५० महिलांपर्यंत समावेश होतो आणि एक महिला पोलीस बडी कॉप’ या ग्रुप मध्ये सहभागी होते. नोकरदार महिला आपल्या कामावरून ये जा करत असताना असुरक्षितपणा जाणवल्यास तातडीने या ग्रुप च्या माध्यमातून पोलीस यंत्रणेला सतर्क करू शकतात.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!