Advertisement

वड्डी ग्रामपंचायत मध्ये जनसुराज्य चा ‘गुलाल’ तर कानडवाडीत फुलले भाजप चे कमळ

प्रतिनिधी सुधीर गोखले

मिरज तालुक्यातील वड्डी आणि कानडवाडी ग्रामपंचायत मध्ये अनुक्रमे जनसुराज्य चा गुलाल आणि भाजप चे कमळ फुलल्याचे पाहायला मिळाले. वड्डी ग्रामपंचायत मध्ये यशोधराराजे शिंदे यांनी तर कानडवाडी मध्ये निवेदिता कांबळे यांनी राजीनामा दिल्याने दोन्ही ग्रामपंचायती ची पोट निवडणूक जाहीर झाली होती. मंगळवारी अत्यंत चुरशीने मतदान झाले. वड्डी मध्ये जनसुराज्य पक्षातर्फे सरपंच पदासाठी झाकीरहुसेन बापुलाल वजीर या अनुभवी तरुणाने आपला उमेदवारी अर्ज भरला होता. तर त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने रुपाली सुहास मगदूम याना उमेदवारी दिली होती. तालुक्यातील या लढतीकडे विशेष लक्ष लागून होते यामध्ये जनसुराज्य चे वजीर यांनी १७६७ इतकी मते मिळवली तर मगदूम याना १०१० मते मिळाली त्यामुळे वजीर याना विजयी घोषित करण्यात आले. या विजयानंतर लोकनियुक्त नूतन सरपंच वजीर यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला असता ते म्हणाले हा विजय जनसुराज्य पक्षाचा आहे पक्षाचा आहे. आमचे नेते मार्गदर्शक पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आम डॉ विनयजी कोरे (सावकर) तसेच जनसुराज्य पक्षाचे प्रदेशअध्यक्ष मा समित जी कदम यांनी मला उमेदवारी देऊन माझ्यावर दाखवलेला विश्वास हा खूप माझ्यासाठी माईल स्टोन आहे. भविष्यामध्ये या गावाचा विकास करून हा विश्वास मी सार्थ करून दाखवेन माझ्या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचे आणि सर्व प्रसिद्धी माध्यमांचे मी मनापासून आभार मानतो’ .

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!