प्रतिनिधी सुधीर गोखले
प्रतिनिधी सुधीर गोखले
मिरज हे कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरील व्यापारी आणि आरोग्याच्या दृष्टीने एक महत्वाचे शहर आहे. तर मिरज जवळील म्हैसाळ नरवाड आणि कागवाड ही गावे सीमेलगत आहेत तर म्हैसाळ पासून थेट तासगाव फाटा किंवा पंढरपूर कडे जाणारा सुभाषनगर चौक याच मार्गांवर येतो या परिसरात सध्या मटका, कॅसिनो जुगार आणि गांजाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. या मध्ये तीस ते पस्तीशीतील तरुणाई इझी मनी मिळवण्यासाठी कॅसिनो किंवा मटका जुगार सारख्या मार्गाचा अवलंब करत आहे तर मोठ्या प्रमाणावर गांजा विक्री वाढल्याने नशेखोरी चें प्रमाण वाढले आहे. यामुळे साहजिकच वाढलेल्या गुन्हेगारी मुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. हा परिसर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येतो. आज आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने पश्चिम महाराष्ट्र सचिव वसीम मुल्ला यांच्या नेतृवाखाली मिरज ग्रामीण चें प्रभारी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. पोलीस निरीक्षक वाघ यांनी आपण निश्चित पणे या बाबींकडे लक्ष देऊन कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कटीबद्ध असल्याचे शिष्टमंडळास सांगितले तर वसीम मुल्ला यांनी स्पष्ट केले की या सर्व अवैध गोष्टी बंद झाल्या पाहिजेत अथवा आम्हाला आंदोलन करावे लागेल. यावेळी या विनायक जंगम कृष्णा माळी संभाजी मोरे आणि इम्रान पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.Website: http://satyarath.com/wp-admin
Leave a Reply