आपल्याकडे क्षयरोग अर्थात टीबी म्हणजे कॅन्सर सारखा अगदी भयानक रोग असा काहीसा गैरसमज झाला आहे मात्र या रोगासंबंधी महापालिकेच्या क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ मंजुषा दोरकर यांच्याशी आमच्या प्रतिनिधी नी संवाद साधला त्यावेळी त्या म्हणाल्या,’नमस्कार प्रथम आपल्या वृत्तवाहिनीस माझ्या शुभेच्छा. क्षयरोग अर्थात टीबी (Tuberculosis) हा मायकोबॅकटेरियम ट्यूबरक्युलंस नावाच्या रोग जंतूमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य रोग आहे. शरीराच्या कोणत्याही भागाला हा रोग जडला जाऊं शकतो केस दात नखें वगळून. या जंतू मुळे फुफुसाला बाधा झाल्यास फुफुसाचा क्षयरोग झाला असे आपण म्हणू शकतो. फुफुसाच्या क्षयरोगाचे आपल्याकडे जास्त प्रमाणावर रुग्ण आढळून येतात. या रोगाचे जंतू विशेष करुन हवेतून पसरतात. क्षयरोग बाधित रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या निरोगी माणसाला श्वासावाटे हे जंतू त्याच्या शरीरात प्रवेश करतात. मात्र यामध्ये एक वैशिष्ट असे की त्या निरोगी माणसाला क्षयरोग होईलच असे नाही. अशा संसर्ग झालेल्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात क्षयरोग होण्याची शक्यता केवळ दहा टक्के असतें. यामध्ये आपण लक्षात घेतले पाहिजे की ज्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी यामध्ये मधुमेह किंवा एच आय व्ही झालेल्या व्यक्ती अशा व्यक्ती ना क्षयरोग होण्याची शक्यता जास्त असतें. भारतामध्ये सध्या दररोज 40टक्के हुन अधिक संसर्ग बाधित आहेत तर क्षयरोग बाधित सहा हजार पेक्षा जास्त आहेत. आणि सहाशे हुन अधिक रुग्ण क्षय रोगाने मरण पावत आहेत. आपल्याकडे फुफुसाच्या व्यतिरिक्त गंडमाळा क्षयरोग, हाडे आणि सांधे यांचा क्षयरोग, जनन आणि विसर्जन याचा क्षयरोग मेंदूच्या आजाराचा क्षयरोग,, मणक्याचा क्षयरोग, आतड्याचा क्षयरोग आदी प्रकार आहेत. त्या पुढे म्हणाल्या आपण आता क्षयरोगी रुग्ण कसा ओळखता येतो त्यासंबंधी लक्षणे अशी आहेत, प्रकार एक मध्ये फुफुसाचा क्षयरोग असणाऱ्या रुग्णाला तीन आठवड्या पेक्षा जास्त बडका युक्त खोकला जास्त काळ टिकणारा असतो. छातीत दुखणे आणि अस्वस्तता येऊ शकते. दुसऱ्या प्रकारात, कमी दर्जाचा ताप जो अनेक दिवस टिकून राहिला असेल रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी त्या तापकडे दुर्लक्ष करू नये तातडीने जवळच्या क्षयरोग निदान केंद्राकडे संपर्क साधावा, तो ताप क्षयरोगाच्या इशारा असू शकतो. यामध्ये ताप येतो जातो आणि रात्री वेळेस घाम येतो. तिसऱ्या प्रकारामध्ये वजन घटते भूक न लागल्यामुळे रुग्णाला जेवण जात नाही त्यामुळे त्या रुग्णाच्या वजनात घट होते हेही एक कारण क्षयरोग होण्याचे असू शकते,. चौथ्या प्रकारामध्ये क्षयरोग सर्वसामान्यपणे फुफुसामध्ये होतो त्यामुळे रुग्णाच्या जर वारंवार छातीत दुखत असेल आणि खोल श्वासोच्छास किंवा खोकल्यामुळे छातीतील वेदना तीव्र होऊ शकतात. चौथ्या आणि पाचव्या प्रकारामध्ये रात्री घाम येणे आणि भूक मंदावण्यासारखे प्रकार घडू शकतात हि सुद्धा क्षयरोगाची लक्षणे असू शकतात असेही त्यांनी नमूद केले. तर काही प्रसंगी गंभीर क्षयरोगी रुग्णांच्या बडक्यामधून रक्त पडते’ डॉ मंजुषा दोरकर म्हणाल्या कि,’ मला अभिमान आहे कि माझ्या या विभागाने गेल्या काही वर्षांपासून महापालिका क्षेत्रामध्ये आमच्या विभागामार्फत क्षयरोग निर्मूलन मोहीम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आली ती उत्तम प्रकारे राबवली यामध्ये महापालिका क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबाला आमच्या विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संपर्क केला त्याचप्रमाणे संशयित क्षयरोग रुग्णांना उपचार देखील झाले आहेत. राज्य शासन आणि केंद्र शासनाने याबाबत आपल्या महापालिकेचा पुरस्कार देऊन गौरव देखील केला आहे. माझे असे म्हणणे आहे कि वेळोवेळी औषधोपचार आणि नेहमी सकस आणि उत्तम आहार हा क्षयरोगावर मात करू शकतो.’ महापालिका .
Leave a Reply