Advertisement

पाचोरा :   रोटरी क्लब पाचोरा भडगाव व अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांचेकडून पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

पाचोरा :   रोटरी क्लब पाचोरा भडगाव व अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांचेकडून पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

पाचोरा :  रोटरी क्लब पाचोरा भडगाव व अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांचेकडून अनेक सेवाभावी उपक्रम घेतले जातात. गेल्या काही दिवसात पाचोरा तालुक्यातील शिंदाड व सातगाव परिसर यामध्ये झालेल्या ढगफुटीने खूप नुकसान झाले. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे वह्या पुस्तक दप्तर सहित सर्वं शालेय साहित्य वाहून गेले, म्हणून रोटरीने या सर्वं मुलांसाठी शैक्षणिक साहित्य समाज विकास मंडळ शिंदाड या शाळेत वाटप केले.यावेळी रोटरी क्लब पाचोरा भडगाव अध्यक्ष डॉ मुकेश तेली,सचिव डॉ अजयसिंग परदेशी,अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्ष व प्रांत सचिव डॉ अनिल देशमुख, तालुकाध्यक्ष संजय पाटील, चंद्रकांत लोढाया, संजय कोतकर,नितीन जमदाडे, पुंडलिक पाटील, लक्ष्मण जाधव,डॉ सिद्धांत तेली,नितीन तायडे यासह शाळेचे मुख्याध्यापक सूर्यवंशी सर,पर्यवेक्षक, इतर शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी रोटरी क्लब पाचोरा भडगाव चे अध्यक्ष यांनी रोटरीच्या अश्या सेवाभावी कार्याचा उल्लेख केला आणि नैसर्गिक आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन अभ्यासासाठी शुभेच्छा दिल्या. अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे डॉ अनिल देशमुख यांनी नैसर्गिक आपत्ती साठी आपण सजग राहून काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी भावेश अहिरराव सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, मुख्याध्यापक सूर्यवंशी सर यांनी आभार मानले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!