सांगली प्रतिनिधी सुधीर गोखले
शहरातील मैदाने उद्याने आणि मोकळया जागेवर बसून मद्यपान करणाऱ्या तळीरामांची झिंग पोलिसांनी पोलिसांनी उतरवली. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार पोलीस प्रशासनाने तब्ब्ल पाचशे तळीरामांना अद्दल घडवली आहे. शहरातील अनेक ठिकाणी ब्लॅक स्पॉट आहेत याचा फायदा मद्यपी आणि नशेखोर घेत आहेत त्याचबरोबर या मुळे गुन्हेगारी वाढत चालली आहे. काही दिवसांपूर्वी कुपवाड येथे सराईत गुन्हेगाराचा खून झाला याचे कारणही मद्यपान होते महापालिकेच्या काही उद्यानात तर दिवसा मद्यपान करणारे मद्यपी यापूर्वी आढळून आले आहेत. काही उद्यानांमध्ये विद्युत पुरवठा नाही याचा फायदा हे मद्यपी घेत आहेत. कारखाना परिसरातील एका उद्यानात राजरोजपणे मद्यपान करणारे मद्यपी आहेत स्थानिकांनी तक्रार केली तर मद्यपींकडून शिवीगाळ आणि मारामारीचे प्रकार घडत आहेत. याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अशा मद्यपींवर कडक कारवाईच्या सूचना आपल्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत त्याप्रमाणे गेल्या आठवड्यात पन्नास मद्यपींची झिंग पोलिसांनी उतरवली आहे तर गेल्या सहा महिन्यांमध्ये तब्ब्ल पाचशे मद्यपींवर कारवाई झाली आहे यामुळे सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तळीरामांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
Leave a Reply