सांगली प्रातिनिधी सुधीर गोखले
शैक्षणिक क्षेत्रातील एक आघाडीची शैक्षणिक संस्था म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या चाटे शिक्षण समूहाने विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक कौशल्ये वाढवून त्यांना भविष्यासाठी तयार करण्याच्या उद्देशाने भास्कराचार्य टॅलेंट सर्च स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती शिक्षण समूहाचे संचालक प्रा डॉ भरत खराटे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. ते म्हणाले कि श्री भास्कराचार्य प्रतिष्ठान मार्फत हि स्पर्धा परीक्षा घेतली जाते या स्पर्धे मध्ये विद्यार्थ्यांना एक कोटी रुपयांपर्यंत शैक्षणिक शिष्यवृत्ती तसेच रोख स्वरूपात बक्षिसेही जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. ते पुढे म्हणाले गेल्या २३ वर्षांपासूनसुरु असलेल्या या स्पर्धा परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास वाढीस मदत होत आहे. त्यांना स्पर्धेला सामोरे जाण्याची मानसिकता प्राप्त होते. आता पर्यंत लाखो विद्यार्थ्यांनी या स्पर्धा परीक्षेमध्ये सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेसाठी इयत्ता चौथी ते दहावी तसेच अकरावी आणि बारावी (विज्ञान) चे विद्यार्थी पात्र आहेत या परीक्षेचे स्वरूप ऑफलाईन पद्धतीचे असते तसेच बहुपर्यायी प्रश्न असतात. या परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम हा मागील इयत्तेच्या विज्ञान गणित बुद्धिमत्ता चाचणी आणि फिजिक्स केमिस्ट्री या विषयांवर आधारित असेल. या मधील प्रश्न हे मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये असल्याने सर्व माध्यमांच्या विद्यार्थ्यांना हि परीक्षा उपयोगी आहे. हि स्पर्धा कोल्हापूर सांगली सातारा कोकण आणि सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आहे. नाव नोंदणी करण्याची अंतिम मुदत ११ सप्टेंबर असून इच्छुक विद्यार्थी त्यांच्या शाळांमध्ये किंवा चाटे शिक्षण समूहाच्या नजीकच्या केंद्रांमध्ये आपले अर्ज भरून देऊ शकतात यावेळी सांगली जिल्हा समन्वयक प्रा सादिक मुजावर हे उपस्थित होते.
Leave a Reply