सांगली प्रतिनिधी सुधीर गोखले
शक्तीपीठ महामार्ग हा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून जात आहे मात्र या महामार्गाला मोजक्याच लोकांचा विरोध आहे यामागे कोणती शक्ती आहे हे तपासावे लागेल असे प्रतिपादन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील ध्वजारोहण कार्यक्रमानंतर पालकमंत्री दालनामध्ये प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले या महामार्गाने सर्व धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत. यामुळे आगामी काळात या भागातील विकासालाही चालना मिळणार आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी या महामार्गाला लागणाऱ्या भूसंपादन प्रकियेला सहमती दर्शवली आहे मात्र काही मोजकेच लोक याला विरोध करत आहेत त्यांच्यामागे कोणती शक्ती कार्यरत आहे याचा तपास करावा लागेल. आपल्याला कोयना धारांच्या उभारणीमुळे पाणी आणि वीज मिळाली आपल्या भागाचा मोठा विकास झाला याप्रमाणे हा महामार्ग झाल्यास उद्योग धंदे आणि रोजगाराला चालना मिळेल शेतकऱ्यांनी याला विरोध करू नये शेतकऱ्यांबरोबर चर्चेसाठी आम्ही सदैव तयार आहोत काही मूठभर लोक याला विरोध करायचा म्हणून सहभागी झालेत मात्र शेतकऱ्यांनी यासाठी सकारात्मकता दाखवली पाहिजे शेतकऱ्यांचे हित जपणारे आपले सरकार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
Leave a Reply