रिपोर्टर सुधीर गोखले सांगली
आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीमध्ये नव्या जुन्याचा वाद न करता एकत्र काम केले पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार जास्ती जास्त संख्येने कसे निवडून येतील याचा विचार करा. आगामी निवडणुकीमध्ये सांगली जिल्हा राष्ट्रवादी मय कसा करता येईल याचा विचार करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार यांनी आपल्या भाषणामध्ये केले ते सांगली जिल्ह्या दौऱ्यावर होते काल पक्षाचा मेळावा भोकरे कॉलेज च्या मैदानामध्ये पार पडला त्यावेळी ते बोलत होते ते म्हणाले सांगली मिरजेचा पाणी प्रश्नासह इतरही मूलभूत प्रश्न लवकर मार्गी लावू. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले हे राजय शेतकऱ्यांचे आहे तरुणांना रोजगार मिळण्यासाठी नवीन उद्योग आले पाहिजेत आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व यशवंतराव चव्हाण यांनी पायाभूत सुविधांचा पाय रचला स्व यशवंतराव चव्हाण यांच्या सुसंस्कृत राजकारणाचा वारसा पुढे नेण्याचे काम आमचा पक्ष करतोय हि आम्हाला अभिमानाची बाब आहे. आम्ही सर्व जाती धर्माचा सन्मान करतो तळागाळातील कार्यकर्त्याला न्याय देण्याचे काम आपला पक्ष करतो त्याचेच एक उदाहरण मिरजेला इद्रिस भाई नायकवडी यांना विधानपरिषदेवर पाठवले. त्यांना या भागातील विकास कामासाठी नक्की भविष्यात बळ दिले जाईल.
Leave a Reply