पाचोरा : पाचोरा रोटरीचा अनोखा उपक्रम

सीमेवर असणाऱ्या जवान बांधव यासाठी रोटरी क्लब पाचोरा भडगाव यांनी इन्टेरेक्ट क्लब मार्फत रक्षाबंधन निमित्त सस्नेह भेट म्हणून संपूर्ण बटालियन साठी राखी पाठविण्यात आल्या. असा अनोखा कार्यक्रम साठी रोटरी क्लब पाचोरा भडगाव नेहमीच अग्रेसर असते. त्या अनुषंगाने इंटरेक्ट क्लब निर्मल इंटरनॅशनल स्कुल पाचोरा, माध्यमिक उच्चमाध्यमिक विद्यालय कोंडवाडा गल्ली, पी के शिंदे माध्यमिक विद्यालय पाचोरा या शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी भगिनी यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. यावेळी रोटरी क्लब पाचोरा भडगाव चे अध्यक्ष डॉ मुकेश तेली, सचिव डॉ अजयसिंग परदेशी, रोटरी सदस्य चंद्रकांत लोढाया, संजय कोतकर, शैलेश कुलकर्णी, डॉ प्रशांत सांगडे, डॉ कुणाल पाटील, डॉ नितीन जमदाडे, चिंतामण पाटील यासोबत तीनही शाळेचे मुख्याध्यापक सोमवंशी सर, गणेश राजपूत, श्रीमती उज्वला महाजन, पाटील सर, श्रीमती विद्या कोतकर, श्रीमती सागर मॅडम, हेमंत टोनपे सर हजर होते. यावेळी इंटरेक्ट क्लब च्या सदस्यांना अध्यक्ष डॉ मुकेश तेली यांचे हस्ते नावाचे बॅच वाटप करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब पाचोरा तर्फे सैनिक बांधव यांना मानपत्र पाठविण्यात आले. अशा या सेवाभावी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

















Leave a Reply