Advertisement

ताण-तणाव मुक्त विद्यार्थी धरणगाव येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात IQAC आणि वाणिज्य विभागातर्फे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

सत्यार्थ न्युज प्रतिनिधी -किरण माळी (जळगांव, महाराष्ट्र )

ताण-तणाव मुक्त विद्यार्थी

धरणगाव येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात IQAC आणि वाणिज्य विभागातर्फे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय जगताप यांनी अध्यक्षीय स्थान भूषविले.प्रमुख वक्ता म्हणून नूतन मराठा महाविद्यालयातील प्रा.डॉ. समाधान पाटील हे होते. व्यासपीठावर प्रा. संदीप पालखे,प्रा. डॉ. अरुण वळवी हे मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.यावेळी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा .डॉ. हर्षवर्धन भालेराव यांनी करून दिला. ‘मानसिक ताण-तणाव व्यवस्थापन’ या एक दिवसीय कार्यशाळेला प्रारंभ झाला. प्रमुख वक्त्यांनी विद्यार्थ्यांना ताण-तणावाची कारणे आणि त्या तणावातून बाहेर कसे पडायचे याविषयी सविस्तर असे बहुमूल्य मार्गदर्शन करुन काही प्रयोगातून ताण कसा निर्माण होतो हे समजावून सांगून मेडिटेशन आणि काही व्यायामाच्या मार्फत तणावातून बाहेर कसे पडायचे हे देखील सांगितले.
याप्रसंगी प्रा.डॉ. प्रवीण बोरसे, प्रा. डॉ. कांचन महाजन, प्रा.डॉ.डी.के.गायकवाड,प्रा. डॉ. सुषमा तायडे,प्रा. सुलताना पटेल आणि महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक रितेश साळुंखे व जितेंद्र परदेशी उपस्थित होते. सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित असून सूत्रसंचालन आणि आभार वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांनी केले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!