पाचोरा : पाचोरा शहर पद्मवंशीय तेली समाजा तर्फे हळदी कुंकू स्नेह-मिलन आणि गुणवंत विद्यार्थ्यांना सत्कार
पाचोरा : दिनांक 25/ 1/ 2025 शनिवार रोजी संध्याकाळी *हळदी कुंकू ,स्नेह-मिलन आणि गुणवंत विद्यार्थ्यांना सत्कार सोहळ्याचा* कार्यक्रम हर्ष- उल्लाहासात आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाला या सोहळ्याचे साक्षीदार म्हणून *महाराष्ट्र राज्य कमिटीचे विविध पदाधिकारी* यांनी अमूल्य वेळ देऊन हजर राहिलेत, त्याबद्दल सर्वांचे *पाचोरा कमिटी तर्फे मनापासून धन्यवाद* याप्रसंगी महाराष्ट्र कमिटीतील अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच वीस *गुणवंत विद्यार्थ्यांचा* त्यांच्या आई -वडील,आजी-आजोबा यांच्यासोबत सत्कार करण्यात आला, तसेच पाचोरा शहरांमध्ये *नवीन वास्तव्यास आलेले कुटुंब* यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला ,याप्रसंगी महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारिणी कमिटी चे आधारस्तंभ.. सहकोषाध्यक्ष,ग्राम विकास विद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक *मां.श्री.संजयजी झेरवाल साहेब* यांना *TMG CREATIONS & INNOTIVE* *प्रकाशन मुंबई* यांनी सामाजिक ,शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन *अनुभूती जनसेवा* या *प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला* तेंव्हा या प्रसंगी त्यांनाही गौरवण्यात आले. तसेच पद्मवंशीय तेली समाज ची *दिनदर्शिका* ही प्रकाशित करण्यात आली ,कार्यक्रमानंतर *सुरुची भोजन* , उपस्थित महिलांना *वाणवाटप* कार्यक्रम घेण्यात आला, या कार्यक्रमासाठी योगदान मध्ये *मा.श्री गजानन तेली आणि मा.श्री जगदीश राठोड सर* यांनी अन्नदान आणि वाण वाटप केले आणि गुणवंत विद्यार्थ्यान साठी ट्रॉफीचा खर्च मा.डॉ.श्री प्रशांतजी जगन्नाथ तेली (साई बाल रुग्णालय,पाचोरा) यांनी केले, अशा प्रकारे हा सोहळा आनंदमय वातावरणात पार पडला कार्यक्रमाचे सूत्र सूत्रसंचालन माननीय सौ प्रतिभाताई तेली श्री सुनील सर तेली आणि श्री जगदीश राठोड सर यांनी केले तर आभार माननीय श्री कांतीलाल माहोर यांनी केले
न्यूस देण्यासाठी संपर्क : 9960922398
ब्युरो चिप : चेतन सरोदे पाचोरा