पाचोरा : जय किरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल पाचोरा येथे स्काऊट गाईडच्या माध्यमातून खरी कमाई (फन फेअर) उपक्रम उत्साहात संपन्न…
दि. 4/01/2025 वार शनिवार रोजी जय किरण प्रभाजी न्यू इंग्लिश मीडियम स्कूल पाचोरा येथे स्काऊट गाईडच्या माध्यमातून खरी कमाई (फन फेअर) हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला. स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार कसा मिळेल याचे प्रशिक्षणाच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन केले यातून विद्यार्थ्यांना मागणी व पुरवठा याचा समन्वय कसा साधावा याचे प्रत्यक्ष शिक्षण मिळाले तसेच त्यांना जिवन जगतांना लागणारे व्यवहार ज्ञान मिळाले ह्या उपक्रमास शाळेचे उपाध्यक्ष श्री. गिरीषजी कुलकर्णी स्कूल कमिटी चेअरमन श्री. लालचंद जी केसवानी श्री. पार्थ गिरीष कुलकर्णी श्री. श्रेयांस रितेश ललवाणी श्री. पराग मोर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. ह्या उपक्रमाचे अध्यक्षपद श्री. पार्थ गिरीष कुलकर्णी यांनी स्वीकारले. या उपक्रमात मोर संघ, सिंह संघ, वाघ संघ, बिबट्या संघ, कोल्हा संघ, कोब्रा संघ, जिराफ संघ, झेब्रा संघ, चांदणी संघ, चाफा संघ, पारिजात संघ, निशिगंधा संघ, मोगरा संघ, कमळ संघ, आणि गुलाब संघ अशा स्काऊट गाईडच्या 15 संघांनी आपला सहभाग नोंदवला होता. स्काऊट मास्तर श्री निवृत्ती तांदळे सर यांनी 15 संघांच्या संघनायकांना आलेल्या पाहुण्यांसमोर त्यांचा परिचय करून दिला. व आपला या उपक्रमात कोणता सहभाग आहे हे आलेल्या पाहुण्यांना सविस्तरपणे सांगितले. ह्या उपक्रमाचे वैशिष्ट्य असे की, स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी नवनवीन खाद्यपदार्थांचे 15 स्टॉल लावून त्यांची विक्री केली प्रत्येक स्टॉलमध्ये कोणी पाणीपुरी, वडापाव, भजे, भेळ, सोयाबीन बिर्याणी, व्हेज बिर्याणी, आईस्क्रीम, नमकीन अशा विविध प्रकारचे खाद्यपदार्थांचा सहभाग केला होता. आलेल्या पाहुण्यांनी प्रत्येक स्टॉलवर भेट देऊन प्रत्येक संघनायकाकडे तुम्ही केलेल्या खाद्यपदार्थांची चौकशी केली व विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. तसेच या स्काऊट गाईडच्या उपक्रमास पालकांनी सुद्धा उत्साहात सहभाग नोंदवला. या उपक्रमात शाळेचे संपूर्ण व्यवस्थापक मंडळ तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पुष्पलता पाटील मॅडम शाळेचे सीईओ श्री. अतुल चित्ते सर यांचे मार्गदर्शन लाभले. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे पर्यवेक्षक श्री. किरण बोरसे सर यांनी तर आभार प्रदर्शन शाळेचे पर्यवेक्षक श्री. वाल्मीक शिंदे सर यांनी केले.