रिपोटर : प्रभाकर सरोदे ( पाचोरा )
पाचोरा – विधानसभा निवडणुकीचा निकाल आता स्पष्ट झाला आहे.

पाचोरा : जळगाव जिल्ह्यातील महायुतीच्या सर्वच उमेदवारांनी विजयाकडे वाटचाल केली. यामध्ये आता नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार किशोर पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. मतमोजणीच्या एकूण 26 फेऱ्या पडल्या. यामध्ये सुरुवातीपासूनच आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आघाडी घेतली होती. यामध्ये आता शेवटी किशोर आप्पा पाटील यांनी ऐतिहासिक असा विजय मिळवला आहे. आतापर्यंत या मतदारसंघात कुणीही तिसऱ्यांदा विजयी झाले नव्हते. मात्र, महायुतीचे उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांनी हॅट्रिक करत ऐतिहासिक असा विजय मिळवला आहे.

















Leave a Reply